Latur Sugarcane Fire | दुष्काळात जपलेला तीन एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी

काटेजवळ शिवारातील घटना; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान, पंचनामा करून मदतीची मागणी
Nilanga  Sugarcane Farm Fire
Nilanga Sugarcane Farm FirePUDHARI
Published on: 
Updated on: 

Nilanga Sugarcane Farm Fire

निलंगा : दुष्काळी परिस्थितीत पाण्याची कमतरता असतानाही मोठ्या कष्टाने जोपासलेला तीन एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना काटेजवळ शिवारात घडली. प्रशांत लांबोटे यांच्या सर्व्हे क्रमांक ७० मधील ऊस जळून पूर्णपणे खाक झाला असून, या घटनेत त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेती करणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करत लांबोटे यांनी मोठ्या मेहनतीने तीन एकर ऊस जोपासला होता. पीक काढणीच्या टप्प्यात आले असतानाच अचानक आग लागल्याने संपूर्ण ऊस जळून गेला. त्यामुळे वर्षभराची मेहनत आणि खर्च वाया गेल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

Nilanga  Sugarcane Farm Fire
Latur News : अपघातग्रस्त विद्यार्थिनीच्या मदतीला धावल्या स्वयंसेविका

आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अज्ञात व्यक्तीने ऊस पेटवून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दोषी व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

घटनेची माहिती मिळताच काटेजवळगा गावचे सरपंच शरद सोमवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी शेतकरी प्रशांत लांबोटे यांना धीर दिला.

Nilanga  Sugarcane Farm Fire
Latur News : सणांचा आनंद सोडून कर्तव्य बजावले; खाकीतील योद्ध्यांचा झाला सन्मान !

दरम्यान, महसूल विभागासह संबंधित प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली आहे. तसेच ऊस जाळण्यामागील नेमके कारण शोधून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news