

Makni sarpanch money bundle thrown tehsildar
निलंगा : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरून माकणी येथील सरपंच राहुल माकणीकर यांनी पैश्यांच्या बंडल तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या टेबलावर टाकून प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवला.
लातूर जिल्ह्यावर अतिवृष्टी सह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांवर मोठा संकट उभे राहिले आहे. निलंगा तालुक्यावर सतत सुरू असलेला विसर्ग तसेच मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात गुडघ्या एवढं पाणी साचलं आहे. त्यामुळे पंचनामे महसूल विभागाच्या वतीने करण्यात येत नाही.
जेव्हा शेतात जाण्यासाठी वाट मिळेल तेव्हाच आम्ही महसुल विभाग पंचनामा सोयीनुसार करेल, असे सांगितल्याने सरपंच राहुल माकणीकर यांचा संताप अनावर झाला. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका म्हणत चक्क तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या अंगावर पैश्यांचा बंडल टाकत निषेध व्यक्त केला आहे.