Latur News : कलकोटीत अवैध दारूविक्री विरोधात महिलांचा एल्गार; दारू विक्रेत्याला चोप

तालुक्यातील कलकोटी गावात सुरू असलेल्या विनापरवाना व अवैध दारूविक्रीच्या विरोधात शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास संतप्त महिलांनी आक्रमक पवित्रा घेत एका दारू विक्रेत्याच्या थेट घरात घुसून त्याला चांगलाच चोप दिला.
Latur News
Latur News : कलकोटीत अवैध दारूविक्री विरोधात महिलांचा एल्गार; दारू विक्रेत्याला चोपfile photo
Published on
Updated on

Latur News: Women protest against illegal liquor sale in Kalkoti; Liquor seller beaten up

चाकूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कलकोटी गावात सुरू असलेल्या विनापरवाना व अवैध दारूविक्रीच्या विरोधात शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास संतप्त महिलांनी आक्रमक पवित्रा घेत एका दारू विक्रेत्याच्या थेट घरात घुसून त्याला चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

Latur News
Beed Crime | पुन्हा एकदा दिवसाढवळ्या महिलेचे मंगळसूत्र ओरबडले; पोलिसांचा ‘नो रिस्पॉन्स’, नागरिकांमधून तीव्र संताप

चाकूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून बऱ्याच गावात बेकायदेशीर दारूविक्री सुरू आहे. त्यांना पोलीस कारवाईची भीती राहिली नाही. अवैध दारू ही गावोगावी मिळत असल्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप ग्रामस्थ व महिलांनी केला आहे.

वारंवार तक्रारी करूनही पोलिस प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याने अखेर महिलांचा संयम सुटला आणि शनिवारी सकाळी कलकोटी गावात त्यांनी स्वतःच अवैध दारू विकणाऱ्याच्या घरात घुसून थेट कारवाईचा बडगा उचलला आहे. या अवैध दारूविक्रीमुळे गावातील शांतता, सामाजिक वातावरण आणि अनेक कुटुंबांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत असल्याचा आरोप महिलांनी करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Latur News
Chhatrapati Sambhajinagar crime : सिडको ठाण्याच्या 100 फुटांवर तरुणाची हत्या, तब्बल 7 तासांनंतर पोहोचले पोलिस

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस प्रशासनाने अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून अवैध दारूचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान शनिवारी चाकूर पोलीसांनी अनेक ठिकाणी छापेमारी करीत अवैध दारू विक्री विरोधात कठोर कारवाई केली आहे.

कलकोटीत अवैध दारू विक्रेत्याला आणि मषनेरवाडीत एका धाबा चालकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किरण रायझुबे यांच्या पथकाने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news