Latur News: महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक; दोन हरणांचा बळी

राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दोन हरणांचा मृत्यू झाला.
Deer Killed in Accident
Deer Killed in AccidentFile Photo
Published on: 
Updated on: 

Chakur Deer Killed in Accident

चाकूर : संग्राम वाघमारे

दुष्काळामुळे पाण्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या वन्यजीवांनाही आता जीव गमवावा लागत असल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. चाकूरजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दोन हरणांचा मृत्यू झाला.

ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या पाठीमागे राष्ट्रीय महामार्गावर घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मृत हरणांपैकी एक हरीण गर्भवती असल्याचा अंदाज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या घटनेने वन्यजीवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Deer Killed in Accident
Latur News : सावकाराने हिरावलेली साडेचार एकर जमीन तब्बल ३० वर्षांनी परत! मुंडुबाई डावरे यांचा तीन दशकांचा संघर्ष अखेर संपला

प्राणीमित्र विश्वनाथ एडके हे सकाळी फिरायला आले असताना त्यांना ही घटना समजली. त्यांनी याबाबत वनविभागाचे वनसेवक उद्धव देगणूरे, राजू लिगाडे यांना माहिती देताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत हरणांना ऑटोमध्ये टाकून पुढील कार्यवाहीसाठी नेले. मृत हरणांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, या घटनेने वनविभागाच्या वन्यजीव संरक्षणाच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दुष्काळी परिस्थितीत पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे आणि महामार्गांकडे धाव घेत आहेत. अशा परिस्थितीत वनक्षेत्रातील पाणवठ्यांची उपलब्धता, महामार्गावरील वन्यजीवांच्या हालचालींची ठिकाणे आणि अपघातप्रवण भागांमध्ये आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची जबाबदारी वनविभागाची नाही काय? दोन हरणांचा जीव गेल्यानंतर केवळ मृतदेह उचलून नेणे एवढीच वनविभागाची जबाबदारी आहे का? असा संतप्त सवाल वन्यजीवप्रेमींकडून उपस्थित होत आहे.

राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण नसल्याने वन्यजीवांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. या अपघातातील अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित वाहनचालकावर कायद्यानुसार कारवाई करावी. तसेच अपघातस्थळी पाहणी करून वन्यप्राण्यांच्या सुरक्षित मार्गासाठी सूचना फलक, वेगमर्यादा, आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय आणि पाणवठ्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी वन्यप्रेमीकडून होत आहे.

Deer Killed in Accident
Latur News : दुष्काळग्रस्तांच्या व्यथा ऐकण्यासाठी राज्यपाल बांधावर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.