Latur News : दिलासादायक ! पूरामध्ये पशुधन वाहून गेले, काळजी नको ! गोशाळांमधून जनावरांचे वाटप सुरु

पूरग्रस्त पशुपालकांसाठी लातूर जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम
लातूर
Latur News : दिलासादायक ! पूरामध्ये पशुधन वाहून गेले, काळजी नको ! गोशाळांमधून जनावरांचे वाटप सुरुPudhari News Network
Published on
Updated on

लातूर : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यात अनेक पशुपालकांचे मौल्यवान पशुधन मृत झाले आहे. या नैसर्गिक आ-पत्तीमुळे पशुपालकांच्या उपजीविकेवर परिणाम झाला असून, त्यांना दिलासा देण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनाने एक अभिनव व संवेदनशील उपक्रम हाती घेतला आहे. पूर परिस्थितीत गमाविलेल्या पशुधनाच्या बदल्यात या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध गोशाळांमधील गायी, बैल, कालवडी व गोऱ्हे हे पशुपालकांना देण्यात येत आहेत.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आ-पत्तीग्रस्त पशुपालकांना पुन्हा एकदा उत्पादनक्षम पशुधन उपलब्ध करून देऊन त्यांचे आर्थिक पुनर्वसन करणे, हा उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत उदगीर तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना सोमनाथपूर येथील श्री गोरक्षण गोशाळेमार्फत एकूण १६ पशुधनांचे वाटप करण्यात आले आहे. हा उपक्रम जिल्ह्यातील इतर गोशाळांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

लातूर
Latur rain news: लातूर जिल्ह्यावर आभाळ फाटले; चार तालुक्यासह जिल्ह्यातील 39 मंडळात अतिवृष्टी

पूरग्रस्त पशुपालकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. गोशाळा ह्या समाजसेवेचे केंद्र आहेत आणि पुरामध्ये पशुधन गमाविलेल्या पशुपालकांना त्या आधार देत आहेत, ही आनंदाची बाब आहे.

वर्षा ठाकूर-घुगे जिल्हाधिकारी लातूर

पशुधन मिळवण्यासाठी येथे संपर्क साधा

आपले पशुधन गमाविलेल्या पूरग्रस्त भागातील पशुपालकांनी आपल्या संबंधित पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधावा. पात्र पशुपालकांची यादी तयार करून त्यांची पडताळणी केल्यानंतर जवळच्या गोशाळांशी समन्वय साधून जनावरांचे वाटप केले जात असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यातील सर्व गोश-ाळांनी आपल्या संस्थेत उपलब्ध असलेल्या निरोगी गायी-बैलांची माहिती पशुसंवर्धन विभागास द्यावी, जेणेकरून अशा आपत्तीग्रस्त पशुपालकांना वेळेवर मदत मिळू शकेल, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभघेण्यासाठी संबंधित पशुवैद्यकीय दवाखाना, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन कार्यालय किंवा तालुका पशुधन विकास अधिकारी कार्यालयाशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news