Latur road accident news | चाकूर - लातूररोड बायपास ठरतोय अपघाताचा 'ब्लॅक स्पॉट'

आठ दिवसांत चार जणांचा मृत्यू, नियोजनाची गरज
Latur road accident news | चाकूर - लातूररोड बायपास ठरतोय अपघाताचा 'ब्लॅक स्पॉट'
Published on
Updated on

चाकूर : राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीच्या नियोजनामुळे लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील चाकूर आणि लातूररोड बायपास, टी पॉईंटवर दिवसेंदिवस अपघात वाढले आहेत. या अपघातात आठ दिवसांत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मगील काही दिवसांपासून हे ठिकाण अपघाताचा ब्लॅक स्पॉट ठरत आहे.

राष्ट्रीय महामार्गांवर चाकूर बायपास आणि लातूर रोड बायपास टी-पॉईंटवर दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच आहे. चाकूर बायपासवर शनिवारी पुन्हा एकदा तिहेरी भीषण अपघात झाला आहे. त्या अपघातात अहमदपूरहून लातूरकडे जाणारा आयशर ट्रक (क्रमांक एमपी ०९ जीएच १०२०) भरधाव वेगाने येत असताना चाकूरकडून ( अलगरवाडी पाटी ) बायपासजवळ रस्ता ओलांडत असलेल्या मोटारसायकल स्वराला जोरदार धडक दिली. या दुर्दैवी अपघातात मोटारसायकलवरील जनार्धन काळबा येणगे (वय : ६० वर्षे) व त्यांच्या पत्नी सविता जनार्दन येणगे (वय : ५५ वर्षे, रा.तेलगाव) हे पती-पत्नी जागीच ठार झाले. या धडकेनंतर आयशर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि विरुद्ध दिशेने समोरून लातूरहून शिरूर ताजबंदकडे जाणाऱ्या वॅगनर एम एच २४ बी आर ७१२१ कारवर जोरदार धडकले. वॅगनरमधील श्रेयश सचिन वाघमारे (वय : १६ वर्षे, रा. शिरूर ताजबंद) या तीन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने या धोकादायक ठिकाणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Latur road accident news | चाकूर - लातूररोड बायपास ठरतोय अपघाताचा 'ब्लॅक स्पॉट'
Chakur - Latur bypass | चाकूर - लातूररोड बायपास ठरतोय अपघातांचा 'ब्लॅक स्पॉट', आठ दिवसात चौघांनी गमावला जीव

आठ दिवसापूर्वी वडवळ जवळील शंकरनगर तांडा येथील माजी उपसरपंच पंडित नामदेव पवार (वय : ५७ वर्षे) मोटारसायकलवरून गावाकडे जात असताना लातूर रोड बायपास टी पॉईंटजवळ त्यांच्या मोटार सायकलला उड्डाणंपुलावरून येणाऱ्या भरधाव ऑटोने त्यांना जोरदार धडक दिली. त्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लातूरहून नांदेडकडे गेलेला राष्ट्रीय महामार्ग अतिशय भयावह ठरत आहे. या राष्ट्रीय महामार्गांवर दीड ते दोन किलोमिटर अंतराच्या उड्डाणंपुलाची निर्मिती केली आहे. ती अपेक्षित असलेली ठिकाणे सोडून दुसरीकडेच केल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे.

Latur road accident news | चाकूर - लातूररोड बायपास ठरतोय अपघाताचा 'ब्लॅक स्पॉट'
Latur News : राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीच्या नियोजनामुळे अपघातांचे सत्र सुरुच

चाकूर आणि लातूर रोड बायपास, टी पॉईंटवर दुचाकीवरून जाणारे नागरिक रस्ता ओलांडून जाताना पूर्णपणे गोंधळून जातात. यामुळे तेथे अपघात होत आहेत. चाकूर आणि लातूर रोडचा उड्डाणंपूल जवळपास एक ते सव्वा किलोमीटरचा उभारण्यात आलेला आहे. चाकूरला बायपास अलगरवाडी पाटीजवळ उड्डाणंपूल होणे गरजेचे आहे. परंतु तेथे उड्डाणंपूल न झाल्यामुळे त्या बायपास टी पॉईंटवर राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तो रस्ता अतिशय धोकादायक ठरत आहे. तेथून रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून जावे लागते. कारण नांदेडहून येणाऱ्या वाहनाचा वेग उतारामुळे भरधाव असतो. त्याच्या वेगाचा अंदाज येत नसल्यामुळे याठिकाणी मोठया प्रमाणात अपघात होत आहेत.

Latur road accident news | चाकूर - लातूररोड बायपास ठरतोय अपघाताचा 'ब्लॅक स्पॉट'
Latur Nanded Highway Accident | लातूर रोड टी-पॉईंटवर आणखी एक बळी; लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्ग नियोजनातील त्रुटी कायम

याठिकाणी राष्ट्रीय महामार्गाने अपघात होऊ नये या दृष्टीने कुठलीच नियमावली नागरिकांच्या हितासाठी वापरली नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. पुरेशा सुरक्षा उपाययोजनांचा अभाव, वेग नियंत्रणासाठी प्रभावी यंत्रणा नसणे आणि या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांनी चाकूर बायपास व लातूररोड टी पॉईंटवर उड्डाणपुलाची मागणी केली आहे. त्यावर ठोस कार्यवाही झाली पाहिजे. परिणामी या ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच राहणार आहे. दरम्यान रविवारी सकाळी ८ च्या सुमारास त्या अपघात स्थळापासून काही अंतरावरच दोन चारचाकी वाहनांचा अपघात झाला असून त्या अपघातात दोघे जखमी झाले आहेत.

Latur road accident news | चाकूर - लातूररोड बायपास ठरतोय अपघाताचा 'ब्लॅक स्पॉट'
Road project irregularities Naigaon: मार्किंग एक, काम दुसरंच… नायगाव कुंटूर उमरी रस्ते कामाच्या नावाखाली नेमकं काय सुरू आहे?

तत्काळ उपाययोजना कराव्यात; नागरिकांची मागणी

तालुक्यातील नांदगाव नंतर चाकूर- लातूर रोड बायपास टी पॉईंट हा मोठा अपघाताचा ब्लॅक स्पॉट म्हणून दिवसेंदिवस ओळखला जात आहे. भविष्यात याठिकाणचे अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news