

चाकूर : मुखेडहून पंढरपूर दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीला लातूर नांदेड महामार्गावरील हॉटेल मेघमल्हार जवळ रविवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जण जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
घटनेची माहिती अशी लातूर-नांदेड महामार्गावर लातूरहून अहमदपूरकडे भरधाव वेगाने जाणारी कार क्रमांक एम एच ०२ बी झेड ५४२५ वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एर्टिगा कार क्रमांक एम एच २६ सी पी ६१४४ वर रविवारी दुपारी २.१७ च्या सुमारास हॉटेल मेघ मल्हार जवळ जोरात आदळली.
या भीषण अपघातात मुखेडहून पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेले महेश कुदळे वय २६, राजु सुरेश रनभिरकर वय ४३, सुनिल सुरेश रनभिरकर वय ४१, रत्नाकर गंगाधर कळसकर वय ४३ आणि माधव इबितवाड वय ५६, सर्व रा. मुखेड जि. नांदेड हे पाच भाविक जखमी झाले आहेत.
अपघातातील दोघा जखमींना पुढील उपचारासाठी तातडीने लातूरला हलवण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहे.