

Latur Loni village house fire
उदगीर : तालुक्यातील लोणी येथे एका घराला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत घरातील तीन लाखाचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना गुरुवारी ( दि. ९) दुपारी तीनच्या सुमारास घडली.
लोणी येथील महेताब हबीब शेख यांच्या घराला लागलेल्या आगीत टी.व्ही, फ्रिज, कपाट, कुलर, पलंग, गादी, भांडी, अन्नधान्यासह तीन लाखाचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. आग लागली तेव्हा घरातील लोक शेतीकडे गेले होते. घरात एक वयोवृद्ध महिला व तीन लहान चिमुकले होती. लाग लागल्याचे दिसताच शेतकऱ्यांनी धाव घेऊन वयोवृद्ध महिलेस व चिमुकल्यांना घराबाहेर काढले.
अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाचा बंब येईपर्यंत शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणली होती. तोपर्यंत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने वयोवृद्ध महिला व चिमुकले सुखरूप बाहेर काढले. घटनेची माहिती तलाठी प्रशांत तेरकर यांना माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.