Latur News : लासोना चौक ते बोरोळ चौकापर्यंत रस्ता दुभाजक बनले मृत्यूचा सापळा

उंची निकषाप्रमाणे नसल्याचा आरोप; तोगरी मोड ते लांबोटा रस्ता कामही निकृष्ट
Latur road divider accident risk
लासोना चौक ते बोरोळ चौकापर्यंत रस्ता दुभाजक बनले मृत्यूचा सापळाpudhari photo
Published on
Updated on

वलांडी : निलंगा ते उदगीर रोडवर बोरोळ चौक ते लासोना चौकापर्यंत रस्ता दुभाजक करण्यात येत असून या रस्ता दुभाजकाची किमान उंची दोन ते अडीच फूट असायला पाहिजे परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने या दुभाजकांची उंची एक फुटाची केली असल्यामुळे हे रस्ता दुभाजक मृत्यूचा सापळाच बनत चालला आहे.

दुभाजक होऊन दोन दिवस ही झाले नाही तर आज याच दुभाजकाला चार चाकी वाहन आदळून पहिला अपघात झाला आहे. उंची एक फुटाचीच राहिली तर वारंवार अपघात होतच राहतील सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांची दखल घेऊन या रस्ता दुभाजकाची उंची शासकीय नियमाप्रमाणे वाढवून घ्यावी अशी मागणी देवणीकर करीत आहेत. नियमानुसार उंची वाढऊन दुरुस्ती नाही झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Latur road divider accident risk
Sawantwadi Municipal Council |सावंतवाडी नगरपरिषदेत 'बेनामी' ठेकेदारी? नगरसेवक तौकीर शेख यांनी व्हॉट्सअप चॅटचे पुरावेच सादर केले!

तोगरी मोड ते लांबोटा या रस्त्याचे काम गेली आठ वर्षांपासून कासव गतीने चालू आहे. अनेक ठेकेदार अर्धवट काम करून निघून गेले, त्यामुळे पाच ते आठ वर्षांचा कालावधी असूनही रस्ता अद्याप पूर्ण नाही. रस्त्यावरील अर्धवट काम, लहान पूल व अरुंद जागा यामुळे अपघातांची संख्या वाढली असून अनेक लोक बळी गेले आहेत.

कामाचे व्यवस्थापन करणारे अभियंता या कामावर कधीही उपस्थित राहत नाहीत त्यामुळे ही सर्व कामे मुकादमामार्फत केली जात असतात. सदर रस्ता हा शासकीय नियमानुसार किती दिवसांत काम पूर्ण करायच हे यांचे ॲग्रीमेंट बांधील असतानाही त्या वेळेत काम होत नाही. एका ठेकेदाराने या रस्त्यावरील एक सीलकोटचे काम बाकी ठेवून पलायन केले होते. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर परत एक सिलकोटचे काम आता पूर्ण केले आहे.

या रस्त्यावर असलेले लहान लहान पूल मंजूर आहेत की नाही हे मात्र ठेकेदाराने कळूच दिले नाही परंतु काही सामाजिक संघटनाने अनेक वेळा याअरुंद फुलावर अपघात झाल्यानंतर आवाज उठवला त्यामुळे सदर ठेकेदार काही जुन्याच पुलांना दुरुस्ती करून निघून जाण्याच्या प्रयत्नात आहे तर काही ठिकाणी पुलाचे बांधकाम चालू केले आहे सदर काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून अंदाज पत्रकाप्रमाणे या कामावरील साहित्य वापरले जात नाहीत .

Latur road divider accident risk
Pimpri Chinchwad Budget Controversy: पिंपरी-चिंचवड अर्थसंकल्पावरून खडाजंगी; प्रशासनावर गंभीर आरोप

कामावर प्रशासनाचा अभियंता कधीच उपस्थित राहत नाही. खाजगी ठेकेदारांनी ठेवलेले कंत्राटी अभियंते मात्र या कामावर कधी कधी उपस्थित राहतात तर या कामांचे व्यवस्थापन मुकादमामार्फत केले जाते . यावर कोणताही लोकप्रतिनिधी बोलत नाही. दरम्यान बोरोळ चौक लासोना चौक या शहर अंतर्गत रस्ता दुभाजकांची शासकीय नियमाप्रमाणे उंची वाढवावी अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर देवणीकरांच्या वतीने आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news