Sawantwadi Municipal Council |सावंतवाडी नगरपरिषदेत 'बेनामी' ठेकेदारी? नगरसेवक तौकीर शेख यांनी व्हॉट्सअप चॅटचे पुरावेच सादर केले!

Sawantwadi Municipal Council | सावंतवाडी नगरपरिषदेत बेनामी ठेकेदारी सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय काँग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख यांनी केला.
Sawantwadi Municipal Council
Sawantwadi Municipal Council
Published on
Updated on

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी नगरपरिषदेत बेनामी ठेकेदारी सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय काँग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख यांनी केला. याबाबत ठेकेदारांच्या व्हॉट्सअप चॅटचा पुरावा देत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी गॅस पाईपलाईनच्या कामावरून अधिकाऱ्यांना झापले.

Sawantwadi Municipal Council
Sawantwadi Gas Pipeline Leak | सावंतवाडी हादरली! मोरडोंगरीत पाण्यासाठी खोदाई करताना गॅस पाईपलाईन फुटली

प्रभारी नगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी श्री. शेख यांच्या आरोपांना उत्तर देताना माहिती घेऊन खुलासा करू, दोषी असल्यास कारवाई करू अशी ग्वाही दिली. सावंतवाडी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी लोकमान्य टिळक सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी २४ ठरावांना मंजुरी देण्यात आली. काही मुद्यांवर विरोधी नगरसेवक आक्रमक झाल्याने सत्ताधारी व विरोधकांत शाब्दिक चकमक उडाली. नगराध्यक्ष अॅड. निरवडेकर यांनी कुशलतेने सभा हाताळली.

सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, मोहिनी मडगावकर, वीणा जाधव, सुकन्या टोपले, दिपाली भालेकर, दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर, निलम नाईक, अॅड. सिद्धार्थ भांबुरे, विरोधी शिवसेना नगरसेवक संजू परब, बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सूर्याजी, अॅड. सायली दुभाषी, अॅड. निता सावंत-कविटकर, स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर, काँग्रेसचे तौकिर शेख, उबाठा शिवसेनेचे देवा टेमकर आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच संजू परब यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

मुख्याधिकारी गेले कुठे? असा सवाल करत, त्यांनी प्रशासकीय नियमांवरून सभेला जोरदार विरोध दर्शवला. यावेळी भाजप-शिवसेनेत जुंपलेली पहायाल मिळाले. सभापती सुधीर आडिवरेकर व भाजप नगरसेवकांनी सभा तातडीने सुरू करण्यासाठी जोर लावला होता. सचिव उपस्थित नसले तरी अध्यक्ष असल्याचे त्यांचे म्हणणे होते. मात्र, संजू परब भूमिकेवर ठाम राहिले. मुख्याधिकारी नसल्याने सभेचे कामकाज नियमानुसार चालणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. मुख्याधिकारी रजेवर असतील तर पदभार कोणाकडे आहे? असा सवाल करत श्री. परब यांनी प्रशासनाला जाब विचारला.

या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अॅड. निरवडेकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सभागृहात उपस्थित इतर अधिकाऱ्यांना नियमांनुसार कार्यवाही करण्याच्या आणि आवश्यक माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या. मुख्याधिकारी रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख यांनी ठेकेदारीच्या मुद्द्यावर सभागृहाच लक्ष वेधले. नगरपरिषदेच्या टेंडरबाबत ठेकेदारांचा ग्रुप आहे. या ग्रुपवर गौरव जाधव यांनी विलास जाधव यांना विचारूनच समाजमंदिर येथील टेंडर भराव, ते काम मी करणार आहे असा मेसेज केल्याचे पुरावे सादर केले.

हे विलास जाधव कोण? असा सवाल त्यांनी केला. यावेळी अॅड. अनिल निरवडेकर यांनी विस्तृत माहिती घेऊन दोषी असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, माहिती घेऊन याबाबत खुलासा केला जाईल असे आश्वासन दिले. यात नगरपरिषदेची बदनामी होत असून यावर कार्यवाही करावी, अशी मागणी तसेच नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी केली. श्री. शेख यांनी प्रशासकीय कार्यकाळात मुलगी शिकत असताना तिच्या नावावर ठेका घेतल्याचा आरोप दादा गवंडी यांच्यावर केला.

तर सुशांत बांदेकर व दिनेश मुदगुल हे दोन ठेकेदार सामग्री नसताना कोटींची टेंडर घेऊन काम वाटत आपलं दुकान चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी शिव उद्यानमधील घडलेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. चिमुकल्या मुलीला नादुरुस्त खेळण्यांमुळे इजा झाली असून लक्ष वेधूनही दर्लक्ष केल्याचे त्यांनी सांगितले. लाखोंचा निधीची तरतूद करूनही ही परिस्थिती का? असा सवाल त्यांनी केला.

उद्यान सभापती मोहिनी मडगावकर यांनी मोठी इजा झालेली नसून किरकोळ लागल्याचे सांगितले. संबंधित व्यक्ती मुलांसह रात्रीच्यावेळी उद्यान बंद होण्याच्या दरम्यान तिथे गेल्याचे सांगत चुकीची माहिती प्रसिद्धी माध्यमांनी दिल्याचे म्हटले. नगराध्यक्षांनी हस्तक्षेप केला. तसेच संजू परब यांनी गॅस पाईपलाईनच्या कामावरून अधिकाऱ्यांना झापल. चुकीच्या पद्धतीने काम सुरू असून अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याचे त्यांनी नमूद केले. काही मुद्यांवरून सभागृहात शाब्दिक चकमक उडाली तसेच श्री. परव आणि नगराध्यक्षांनी एकमेकांना कोपरखळी मारण्याची संधी सोडली नाही.

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या रजेच्या अर्जाच्या मुद्यावर आक्षेप घेत अॅड. नीता सावंत-कविटकर यांनी हा मुद्दा मागच्या सभेत का घेतला गेला नाही? तसेच २० जानेवारीला अर्ज येण्याआधी पदभार उपनगराध्यक्षांना दिला का ? असा सवाल केला.

Sawantwadi Municipal Council
Deepak Kesarkar | नैतिकता शिल्लक असेल, तर केसरकरांनी राजीनामा द्यावा

यावर अॅड. सिद्धार्थ भांबुरे यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करून अर्ज सादर केल्याचे सांगितले. नगरसेवक अजय गोंदावळे यांनी नळपाणी व गॅस पाईपलाईन कामावेळी ठेकेदारांकडून माती गटारात टाकल्याचे निदर्शनास आणून देत तत्काळ सफाईची मागणी केली. नगरसेवक देवा टेमकर यांनीही त्याला दुजोरा दिला.

आयत्यावेळीच्या विषयात अनेक समस्यांचा उहापोह !

आयत्यावेळीच्या विषयात सभापती दिपाली भालेकर यांनी पाणपोई विषय, नगरसेविका अॅड. नीता सावंत-कविटकर यांनी स्मशानभूमीजवळील दफनभूमी, पाणपोई व गवा रेड्यांचा उपद्रव, अॅड. सायली दुभाषी यांनी पाणी टंचाई, देव्या सूर्याजी यांनी सीसीटीव्ही, नळपाणी योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे द्यावे आदी मुद्दे मांडले. बाबू कुडतरकर यांनी ठेकेदारांच्या मुद्यावर अंदाजपत्रकातच तरतूद केली जावी, असा विषय मांडला. न. प. आस्थापनेवरील सफाई कामगारांच्या वारसांना सफाई कामगार म्हणून लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार नेमणूक करण्याचा ठराव मंजूर केल्याबद्दल अॅड. निरवडेकर यांनी सभागृहाचे अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news