लातूरसह परिसरात मुसळधार पाऊस: जिल्ह्यात दोन दिवस यलो अलर्ट

लातूरसह परिसरात मुसळधार पाऊस: जिल्ह्यात दोन दिवस यलो अलर्ट

लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आज (दि.२०) दुपारी चारच्या सुमारास झाला. तर औसा तालुक्यात अर्ध्या तासापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. आंब्याची मोठी गळ झाली असून द्राक्ष बागांना फटका बसला आहे. रानातील कडबा भिजला आहे. शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

दापेगाव, नागरसोगा, औसा शहरासह, बोरफळ, वाणवडा, जवळगा पो, आलमला भागात वादळी वाऱ्यामुळे अनेक घरावरील पत्रे उडाले. आंब्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने 21 आणि २२ एप्रिलरोजी लातूर, बीड, धाराशिव, नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर येथे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर असा राहणार आहे.

हेही वाचा 

logo
Pudhari News
pudhari.news