Latur crime : लातूरमध्ये तोतया पोलिसास अटक, साडेचार लाख जप्त

अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Latur Crime News
लातूरमध्ये तोतया पोलिसास अटक, साडेचार लाख जप्तpudhari photo
Published on
Updated on

लातूर : स्वतः पोलिस अधिकारी असल्याचा बनाव करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका तरुण तोतया पोलिसास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून 4 लाख 30 हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. विजय अनिरुद्ध कदम (वय 25, रा. परभणी) असे त्याचे नाव आहे.अहमदपूर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मागील दोन वर्षांपासून नांदेड आणि परभणी जिल्ह्यात अशाच फसवणुका करत होता. आरोपी वर्तमानपत्रातील चोरीच्या घटनांची माहिती गोळा करून, नागरिकांना पोलीस अधिकारी असल्याचे दाखवून आणि बनावट पंचनामे तयार करून पैसे घेत असे.

Latur Crime News
Gevrai illegal sand mining : गेवराई तालुक्यात वाळूमाफियांचा उच्छाद

दरम्यान त्याने मी पोलीस अधिकारी आहे, तुमचे चोरी गेलेले सोने परत मिळवून देतो असे सांगून 19 मार्च रोजी त्याने एकाचे पाच लाख रुपये घेतले त्यापैकी 70 हजार त्याने स्वतः खर्च केले आणि उर्वरित त्याच्याजवळ असलेले 4 लाख 30 हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे. कोणतीही व्यक्ती स्वतःला पोलिस अधिकारी म्हणत पैसे मागत असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा,असे आवाहन लातूर जिल्हा पोलिस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

Latur Crime News
Jalna garbage management : महापौर-उपमहापौरांनी घेतला शहर स्वच्छतेचा आढावा

ही कारवाई पोलीस अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलिस उपनिरीक्षक प्रमोद नानासाहेब देशमुख,पोलीस अंमलदार संजय कांबळे, सुरेश कलमे, मोहन सुरवसे, राजेश कंचे, शैलेश सुडे, पाराजी पुटटेवाड, तुळशीराम बरुरे, महिला पोलिस अंमलदार अंजली गायकवाड यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news