Earthquake mock drill in Latur : भूकंपामुळे इमारत कोसळली; जखमींना तातडीने मदत मिळाली

लातूर : आपत्ती व्यवस्थापनाच्या रंगीत तालमीने लक्ष वेधले
Earthquake mock drill in Latur
भूकंपामुळे इमारत कोसळली; जखमींना तातडीने मदत मिळालीpudhari photo
Published on
Updated on

लातूर : जिल्हा क्रीडा संकुल परिसरात आज सकाळी साडेअकरा वाजता मोठा आवाज झाला. भूकंपाच्या धक्क्याने येथील इमारत कोसळल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून स्थानिक अग्निशमन पथक, आपदा मित्रांचे शोध व बचाव पथक तसेच रुग्णवाहिका आणि आरोग्य पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. हा प्रसंग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भूकंपविषयक आपत्ती व्यवस्थापनाच्या रंगीत तालमीचा होता.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर-घुगे, औसा-रेणापूर उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, औसा तहसीलदार घनश्याम अडसूळ, पुणे येथील एनडीआरएफचे सहाय्यक कमांडंट गौरव जांकटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Earthquake mock drill in Latur
Pradhan Mantri Awas Yojana scam : प्रधानमंत्री आवास योजनेत कोट्यवधींचा घोटाळा !

सुरुवातीला स्थानिक पथकांनी घटनास्थळी पोहोचून पोलिसांकडून दिलेल्या निर्देशानुसार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. पोलीस, अग्निशमन दल आणि आपदा मित्रांच्या मदतीने जखमींचा शोध घेतला आणि त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णवाहिकेतून पाठवले. भूकंपामुळे इमारतीत लागलेली आग अग्निशमन पथकाने तत्काळ नियंत्रणात आणली.

एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन श्वान पथक आणि अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. तालमीत सहभागी झालेले अधिकाऱ्यांनी एकाच ठिकाणी विविध विभागांचे समन्वय साधून आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण पेश केले.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी, स्थानिक पथकांच्या कार्यक्षमतेत आणखी सुधारणा करण्यासाठी एनडीआरएफच्या सहकार्याने लवकरच प्रशिक्षणाची योजना सुरू करण्यात येईल, असे सांगितले. भूकंपासारख्या आपत्तीच्या वेळी सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधणे, त्यांची क्षमता वाढवणे यासाठी ही रंगीत तालिम आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी इन्सीडंट कमांडर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी यांनी डेप्युटी इन्सिडेंट कमांडर म्हणून जबाबदारी पार पाडली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ लातूर उपकेंद्राचे डॉ. प्रमोद पाटील, एम. ए. खान, महानगर गॅसचे सेफ्टी ऑफिसर अक्षय कुचेकर यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.

Earthquake mock drill in Latur
Jalna chia cultivation : 963 हेक्टरवर चिया काची लागवड

लायजनिंग ऑफिसर म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद कलमे, कमांड पोस्ट प्रमुख म्हणून नंदकिशोर करले, कम्युनिकेशन पोस्ट प्रमुख म्हणून शीतल शिंदे व श्रीराम वाघमारे, स्थानिक ऑपरेशन प्रमुख म्हणून अग्निशमन अधिकारी बापू किरण देशमुख, उदगीरचे अग्निशमन अधिकारी क्षीरसागर, अहमदपूरचे अग्निशमन अधिकारी कैलास सोनकांबळे, मेडिकल पोस्ट प्रमुख म्हणून डॉ. विशाल गरड, तसेच लॉ अँड ऑर्डर प्रमुख म्हणून पोलीस उपनिरीक्षक मुख्तार शेख यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागातील श्रीराम वाघमारे, इनायत पटेल, सय्यद गफार आणि श्रीमती आफ्रोज शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news