Jalna chia cultivation : 963 हेक्टरवर चिया काची लागवड

आर्थिक स्थिरता मिळवून देणारे चिया पीक ः अमोल आगवण; पीक उत्पादनाकडे कल
Jalna chia cultivation
963 हेक्टरवर चिया काची लागवडpudhari photo
Published on
Updated on

जालना ः चिया पीक उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे लाभ होऊ शकतो. सध्या जालना जिल्ह्यात सुमारे 963 एकर क्षेत्रावर चिया पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. या चिया उत्पादनातून सुमारे 23 ते 24 हजार प्रति क्विंटल उत्पन्न मिळू शकते, अशी माहिती आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांनी दिली.

दरम्यान, एक एकरात चिया बियाणे पिकवायचे असेल तर सुमारे 4 ते 5 किलो बियाणे लागतात. यातून एकरी 6 ते 7 क्विंटल उत्पादन घेतल्या जाऊ शकते. त्याच वेळी, मुख्य पीक म्हणून बियाणे लागवडीसाठी पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो. जवळपास शेतकऱ्यांना अवघ्या तीन महिन्यांत 6-7 क्विंटल उत्पादन आरामात मिळते.

Jalna chia cultivation
Mechanised farming : हार्वेस्टरच्या मदतीने गहू काढण्याकडे शेतकऱ्याचा कल

कृषी विभागाच्या वतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्म्याच्या वतीने जिल्ह्यातील शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी जनजागृती करण्यात येते. शिवाय, केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

पारंपरिक पिके सोडून शेतकरी आता हळूहळू नवीन पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत. चिया बियाणे देखील एक समान पीक आहे. चियाला नवीन काळातील सुपरफूड असेही म्हणतात. आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याने बाजारात त्याचा भाव चांगला राहतो.

Jalna chia cultivation
Beed Burglary Case : पाटोद्यात घरफोडी; ऊसतोड मजुराचे कष्टाचे 9 लाख अन्‌‍ सोने लंपास

चिया पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्याचा व संबंधित कर्मचारी यांचा अभ्यास दौरा नीमच मंडी व इंदोर येथे प्रकल्प संचालक आत्माच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

कमी पाण्यात येणारे व जास्त नफा देणारे पीक

कमी पाण्यात येणारे व जास्त नफा देणारे हे पीक 5 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत लागवड शेतकऱ्यांनी केली असून सेंद्रिय व्यवस्थापन व योग्य पेरणी तंत्रावर या भर देण्यात आला. या उच्चमूल्य पिकातून शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक आधार मिळवून देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आत्माने ठरवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news