

शहाजी पवार, लातूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणीत सहकार पॅनलने १९ पैकी १५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले, तर भाजपला चार जागांवर समाधान मानावे लागले. या निकालाने जिल्हा कराड घराण्यांतील उमेदवारांचे विजय हे वैयक्तिक राजकीय यश असले, तरी त्यावरून संपूर्ण महायुतीच्या यशाचे चित्र उभे राहू शकत नाही.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसने महायुतीला मोठा धक्का देत १९ पैकी १४ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. सहकार महर्षी आणि राजकीय घराण्यांच्या प्रभावामुळे महायुतीच्या नेत्यांची रणनीती आणि गणित पूर्णपणे कोलमडल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
निवडणुकीच्या सुरुवातीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद आणि जिल्हा बँक ताब्यात घेण्याचे लक्ष्य असल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष निकालात काँग्रेसप्रणीत पॅनलने १५ जागा जिंकत हे गणित बदलले. भाजपच्या चार विजयी उमेदवारांमध्ये अरविंद पाटील निलंगेकर, ऋषिकेश कराड, भगवानराव पाटील आणि अतुल गंभीर यांचा समावेश आहे.
निलंगा आणि पतसंस्था मतदारसंघात ज्या ताकदीने नियोजन आणि प्रति पणाला लावली गेली, तसे प्रयत्न इतर मतदारसंघांत झाले ?, हा प्रश्न उपस्थित होत आहे. रेणापूर, उदगीर, जळकोट, चाकूर, अहमदपूर आणि लातूरमधील निकाल महायुतीच्या दाव्यांशी विसंगत ठरले. पराभूत उमेदवारांसाठी नेत्यांनी किती प्रभावी दरम्यान, अरविंद पाटील निलंगेकर यांनी पाच संचालक निवडून आल्याचा दावा करताना औशातील बिनविरोध विजयी शोभा अभिमन्यू पवार यांचाही समावेश केला. मात्र त्यांच्या उमेदवारीची राजकीय पार्श्वभूमी आणि निवडणूक प्रक्रियेतील घडामोडींमुळे या दाव्याची चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने मिळवलेल्या बहुमताचा काँग्रेसकडून जल्लोष करण्यात आला. या निकालाने जिल्ह्यातील राजकीय नेतृत्व, परस्पर संबंध आणि आगामी समीकरणे चर्चेत आणली आहेत.
नेत्यांचे गणित, कार्यकर्त्यांची फरपट !
महायुतीतील नेतेमंडळी आपापल्या गणगोतासाठी मनोभावे मैदानात उतरली; मात्र पक्षासाठी वर्षानुवर्षे झटणारे कार्यकर्ते तसे अंतरावरच राहिले. निवडून येण्याची शक्यता असलेल्या जागांवरही नेत्यांनी अपेक्षित लक्ष दिले नाही.' कार्य तो दिखे पर कर्ता ना दिखे' अशी कार्यकर्त्यांची निस्पृह ओळख देणाऱ्या आणि खरी ताकद कार्यकर्तेच असल्याचे सांगणाऱ्या नेत्यांनी प्रत्यक्षात कार्यकर्त्यांना कोणता न्याय दिला?, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
निवडणूक सहकाराची; दिवाळी घराण्यांची !
निकाल जाहीर होताच राजकीय वर्तुळात आनंदाचे फटाके फुटले. बँकेवरील सत्ता कायम राखल्याने देशमुख परिवाराची दिवाळी गोड झाली. सहकारमंत्र्यांच्या पुतण्या आणि जावयाच्या विजयाने त्यांच्या घरात दुहेरी आनंद झाला. निलंगेकर बंधूच्या गोटात उत्साह संचारला, तर आमदार रमेशअप्पा कराड यांच्या मुलाच्या विजयाने त्यांचाही आनंद द्विगुणित झाला. पत्नीची बिनविरोध निवड झाल्याने आमदार अभिमन्यू पवार यांच्यासाठीही हा निकाल कौटुंबिक आनंदाचा ठरला.
महायुतीतले घटक, प्रचार मात्र काँग्रेसचा !
महायुतीतील घटक असलेले राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेसप्रणीत सहकार पॅनलचा उघड प्रचार केला. दुसरीकडे, भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा पवार यांच्या विरोधातील काँग्रेस उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने त्यांचा विजय बिनविरोध झाला. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांच्या छायाचित्रांत शोभा पवार यांचेही छायाचित्र झळकले. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत आमदार अभिमन्यू पवार यांचा प्रत्यक्ष सहभाग मात्र दिसला नाही.