Latur District Bank : लातूर जिल्हा बँकेकडून १ हजार ४ कोटी २८ लाखांचे पीक कर्ज वाटप

शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम करत राहू; जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांची ग्वाही
Latur District Bank
Latur District Bank : लातूर जिल्हा बँकेकडून १ हजार ४ कोटी २८ लाखांचे पीक कर्ज वाटप File Photo
Published on
Updated on

Latur District Bank distributes crop loans worth Rs 1,04 crore 28 lakhs

लातूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य व देशभरात सहकारातील यशस्वी बँक म्हणून ओळखली जात असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वर्ष २०२५-२०२६ मधील खरीप हंगामासाठी १ हजार ४ कोटी २८ लाखाचे पिक कर्ज वाटप केले आहे. शासनाकडून लातूर जिल्हा बँकेस ९३३ कोटी ९८ लाख एवढे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते.

Latur District Bank
Latur News|हातातोंडाशी आलेला घास हिरावला: निलंग्यात पावसामुळे उभ्या पिकांना फुटले कोंब, शेतकरी हवालदिल

इतर बँकांच्या तुलनेत लातूर जिल्हा बँक पिक कर्ज वाटपात सर्वात जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार धिरज देशमुख म्हणाले की, वेळेवर कर्ज वाटप करून शेतकऱ्यांना मोठा आधार देण्याचे काम सातत्याने होत असल्याने सर्व शेतकऱ्यांना लातूर जिल्हा बँक आपली वाटते.

तो विश्वास कायम ठेवत शेतकरी हिताची वाटचाल सुरू असून भविष्यात देखील त्याच भावनेतून काम करत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. शासनाकडून लातूर जिल्हयातील सर्व बँकांना खरीप हंगामासाठी 1984 पीक कर्ज वाटपाचे ३ हजार १०० कोटी एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते.

यापैकी एकट्या लातूर जिल्हा बँकेने १३०२४४ शेतकरी सभासदांना १ हजार ४ कोटी २८ लाख एवढ्या रकमेचे पीक कर्ज वाटप केलेले आहे. पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट एप्रिल २०२५ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीसाठी असून लातूर जिल्हा बँकेने १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत १०८ टक्के एवढे उद्दिष्ट गाठले आहे. सप्टेंबर २०२५ अखेर जवळपास १३५% पिक कर्ज उद्दिष्ट पुर्तता होईल असे बँकेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

एकट्या लातूर जिल्हा बँकेने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक १०८ टक्के एवढे पीक कर्जवाटप करून शेतकऱ्यांप्रती बांधिलकी जोपासली आहे. लातूर जिल्हा बँकेचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख, सर्व संचालक मंडळाने सातत्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावरून दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news