Latur crime | उदगीर शहरात महिलेचा विनयभंग, ऑटो चालकावर गुन्हा दाखल

घटनेचा उद्देश ‘वाईट उद्देशाने विनयभंग करणे’ असा नोंदवण्यात आला आहे
Woman Assault
Woman AssaultPudhari
Published on
Updated on

उदगीर : उदगीर शहरात बौद्ध विहारासमोर मोकळ्या जागेतून घरी जाणाऱ्या ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी अज्ञात ऑटो चालकाविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Woman Assault
ओडिशाहून चंद्रपुरात गांजा तस्करी; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, ३६ वर्षी पीडित महिला ही दि. १ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता बौद्ध विहार, उदगीरच्या उत्तरेस १ किमी अंतरावर असलेल्या मोकळ्या जागेतून घराकडे जात होती. त्यावेळी एम, एच २४ ऐ ,टी , २२३६ क्रमांकाच्या ऑटोचा चालक अचानक ऑटोतून उतरून फिर्यादीसमोर पूर्णपणे विवस्त्र अवस्थेत आला. तसेच फिर्यादीला ‘छिनाल’ अशी शिवीगाळ करून हाताला व साडीला धरून ओढले व विनयभंग केला.

Woman Assault
Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये माणुसकीला काळिमा! महिलेचे केस कापून चपलांच्या हारासह काढली धिंड; सात जणांवर गुन्हा दाखल

या प्रकारामुळे फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी दि. २जून २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता उदगीर शहर पोलीस ठाण्यात हजर होऊन तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २०५/२०२६ अन्वये, बी, एन ,एस , कलम ७४, ७६, ७९, २९६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा उद्देश ‘वाईट उद्देशाने विनयभंग करणे’ असा नोंदवण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोह/१०४० गोलंदाज हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news