Chakur Women Protest | मनरेगा कामासाठी चाकूर पंचायत समितीसमोर महिलांची निदर्शने

MGNREGA Demand Protest | गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा
Chakur Panchayat Samiti Women Agitation
Chakur Panchayat Samiti Women AgitationPudhari
Published on
Updated on

Chakur Panchayat Samiti Women Agitation

चाकूर : स्वाभिमानी मजूर संघटनेच्या वतीने मनरेगा अंतर्गत काम देण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. ६) महिलांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. दरम्यान गटविकास अधिकारी यांना निवेदन देवून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला

त्यांनी दिलेल्या निवेदनात तालुक्यातील अनेक गावांतील मजुरांनी नमुना क्र. ४ भरून कामाची मागणी केली असूनही त्यांना अद्याप काम देण्यात आलेले नाही. कामाची मागणी करून १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही काम न दिल्यास संबंधित मजुरांना बेरोजगार भत्ता देण्याची तरतूद आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Chakur Panchayat Samiti Women Agitation
Latur news | चाकूर तालुक्यात राजमा पिकाचे क्षेत्र वाढले: शेतकऱ्यांची हरभऱ्याऐवजी राजमा पिकाला अधिक पसंती

यासोबतच ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक किंवा रोजगार सेवकांनी नमुना क्र. ४ दाखल करून घ्यावा, काम मागणी करणाऱ्या मजुरांना तातडीने काम द्यावे, तसेच मनरेगा मजुरी दर वाढवून ८०० रुपये प्रतिदिन करावा, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मागण्यांकडे लक्ष न दिल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी मजूर संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर वर्षारानी वाघमारे,अंजली येदले,दैवशाला काकनाटे,आम्रपाली तिगोटे,पंचशीला बनसोडे आदीच्या स्वाक्षरी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news