Latur atrocity case|सासूच्या राख सावडण्याच्या कार्यक्रमात सुनेचा जातीवाचक अपमान; दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

Latur atrocity case | उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा; नरसिंगवाडी येथील घटना, तपास पोलीस उपाधीक्षक भातलवंडे यांच्याकडे.
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

उदगीर : सासूच्या निधनानंतर राख सावडण्याच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सुनेला जातीवाचक शिवीगाळ करून गळा धरून लाताबुक्क्याने मारहाण केल्याची घटना घडली. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नरसिंगवाडी (ता. उदगीर) येथे घडली आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी -गु.र.नं. ७२० /२०२६; कलम ३(१)r, ३(१)s, ३(२)va अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा सह कलम ११५ (२), ३५१;(२), ३५२; ३ (५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्याद श्रीमती श्रीदेवी पांडुरंग टोप्पे (वय ४३, व्यवसाय घरकाम, रा. गायत्री नगर, बस डेपो पाठीमागे, लातूर) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी धर्मा रामकिसन कोलेवाड, व्यंकटेश धर्मा कोलेवाड (दोन्ही रा. नरसिंगवाडी, ता. उदगीर) फिर्यादी श्रीदेवी टोप्पे या त्यांचे पती व दोन मुलांसह सासू मरण पावल्याने त्यांच्या राख सावडण्याच्या कार्यक्रमासाठी दि. १३ ऑक्टोबर, २०२६ रोजी सकाळी ९ वाजता नरसिंगवाडी येथील शेतात आल्या होत्या. तेथे सर्व लोक दूध घालत असताना शेवटी फिर्यादी राहिल्या होत्या. त्यावेळी सुक्षमताई यांनी "तुम्ही राहिला आहात, दूध घाला" असे म्हटले असता फिर्यादी म्हणाल्या की, "मला कसंतरी वाटत आहे, आम्ही २४ वर्ष घराबाहेर राहिलो."

याचाच राग येऊन त्यांचे दीर असलेल्या आरोपींनी सुनेला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच आरोपी व्यंकटेश कोलेवाड याने फिर्यादीच्या गळ्याला धरून लाताबुक्क्याने मारहाण करीत "तू इथून जा, नाहीतर तुला पोरं लावून खतम करून टाकीन" अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

Crime News
Latur News : लातूर शहरातील ११ जलकुंभांची पाहणी

ही घटना घडल्यानंतर फिर्यादी यांनी दि. १५ ऑक्टोबर, २०२६ रोजी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे हजर येऊन जबाब दिला. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आहे. या गुन्ह्याची नोंद दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता नोंद क्रमांक ३५ अन्वये करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भातलवंडे, उपविभाग उदगीर हे करीत आहेत.

Crime News
Latur Accident | लातूर-झहिराबाद महामार्गावर दुचाकींची धडक; आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news