Maharashtra Local Body Elections
Ahmadpur Taluka NewsPudhari

Latur ZP Election | अहमदपूर तालुक्यात २०० केंद्रांवर १ लाख ६० हजार मतदार मतदानाचा हक्का बजावणार

६ जिल्हा परिषद व १२ पंचायत समिती गटांसाठी मतदानाची तयारी पूर्ण
Published on

Maharashtra Local Body Elections

अहमदपूर : तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होत असून प्रशासनाने मोठ्या उत्स्फूर्ततेने तयारी पूर्ण केली आहे. शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणातून मतदान कर्मचारी आपले साहित्य घेऊन मतदान केंद्रांच्या दिशेने निघाले आहेत. तब्बल नऊ वर्षांनंतर तालुक्यात ही स्थानिक स्तरावरली निवडणूक होत आहे.

तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गटांसाठी २७, आणि १२ पंचायत समिती गणांसाठी ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी २०० मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून सकाळ ७.३० ते संध्या ५.३० या वेळेत एकूण १,६०,६९३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Maharashtra Local Body Elections
Latur Mayor | लातूर महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे तर उपमहापौरपदी...

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना:

  • २०० मतदान केंद्रांवर प्रत्येकी ४ कर्मचारी आणि १ पोलिस कर्मचारी अशी एकूण १००० कर्मचाऱ्यांची (२०० टीम) नेमणूक करण्यात आली आहे.

  • आपत्कालीन परिस्थितीसाठी २० अतिरिक्त रिझर्व टीम तयार ठेवण्यात आल्या आहेत.

  • तांत्रिक अडचणी झाल्यास मदतीसाठी २४ मास्टर ट्रेनर नियुक्त केले आहेत.

  • पाहणी आणि नियंत्रणासाठी २४ झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

  • मतदान कर्मचारी व सहाय्यकांची वेळेत केंद्रावर पोहोच सुनिश्चित करण्यासाठी २५ एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

  • प्रत्येक मतदान केंद्रावर अपंग मतदारांसाठी व्हीलचेअरची सोय करण्यात आली आहे.

Maharashtra Local Body Elections
Latur Gram Panchayat News | चाकूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीवर येणार प्रशासकराज


उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले आणि पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली १४ पोलीस उपनिरीक्षक, २२३ पोलीस कर्मचारी, ३२६ होमगार्ड, आणि एसआरपीच्या दोन सेक्शन्सचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

निवडणूक यशस्वी, निकोप व पारदर्शक पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे, सहाय्यक निवडणूक अधिकारी व तहसीलदार उज्वला पांगरकर, गटविकास अधिकारी पंकज शेळके, तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे, नायब तहसीलदार संतोष अनर्थे, तसेच अभिलाष जगताप, मुनव्वर मुजावर, संजय भोसीकर, शुभांगी जवादे, राजाभाऊ खरात, नामदेव अर्जुने, मंडळ अधिकारी ए.आर. निंबाळकर, तलाठी अविनाश पवार, सोमनाथ गिरी यांसह अनेक अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news