Latur Accident| रस्ता ओलांडताना चिमुकल्याचा कारखाली चिरडून दुर्दैवी अंत

शाळेत जात असताना चिमुकल्यावर काळाचा घाला
Latur Accident News
रस्ता ओलांडताना चिमुकल्याचा कारखाली चिरडून दुर्दैवी अंत
Published on
Updated on

चाकूर : तालुक्यातील आष्टा गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शाळेत जाण्यासाठी निघालेल्या ७ वर्षीय चिमुकल्याचा कारच्या धडकेत मृत्यू झाला. आष्टामोड-नळेगाव रोडवरुन रस्ता ओलांडून स्कूलबसकडे जात असताना सोमवारी (दि.८) सकाळी ८.३० च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अथर्व उर्फ मोगली उद्धव गायकवाड (माळी) असे या ७ वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे आष्ठा गावावर शोककळा पसरली आहे. हा चिमुकला आष्ठा गावचे सरपंच सावता माळी यांचा नातू असल्याची माहिती समोर आली आहे.

Latur Accident News
Solapur Accident : आजीच्या डोळ्यादेखतच पाच वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत; माळशिरस येथील घटना

अथर्व हा आर.पी.भंडारी प्राथमिक विद्यालयात पहिलीच्या वर्गात शिकत होता. रस्त्याच्या पलीकडे थांबलेल्या स्कुलबसमधून शाळेत जाण्यासाठी निघाला असता रस्ता ओलांडताना नळेगाव कडून आष्टामोडकडे जाणाऱ्या कारने त्याला जोराची धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेहाचे शवविच्छेदन शासकीय रूग्णालय लातूर येथे करण्यात आले असून चिमुकल्यावर आष्टा येथे सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आई-वडीलांना अथर्व एकच मुलगा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्याच्या पश्च्यात आई -वडील, आजी -आजोबा, दोन चुलते - चुलती एक बहीण असा परिवार आहे. या घटनेतील कार चालक कारसह फरार असून चाकूर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

Latur Accident News
Accident News: रक्षाबंधनाच्या दिवशीच काळाचा घाला; भरधाव पिकअपच्या धडकेत भावाचा दुर्दैवी अंत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news