Knife Attack : झरीत एकावर चाकूहल्ला; एक जण गंभीर जखमी, आरोपी अटकेत

तालुक्यातील झरी बु. येथे पत्नीला सासरी पाठविण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकावर चाकूहल्ला
chakur crime news
Knife Attack : झरीत एकावर चाकूहल्ला; एक जण गंभीर जखमी, आरोपी अटकेतPudhari File Photo
Published on
Updated on

Knife Attack in Zhari; One Seriously Injured, Accused Arrested

चाकूर, पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील झरी बु. येथे पत्नीला सासरी पाठविण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकावर चाकूहल्ला केल्याची गंभीर घटना १७ मार्च २०२६ रोजी मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

chakur crime news
Latur Crime | पत्नीला सासरी पाठवत नाही: घरात घुसून मेव्हण्यावर चाकू हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्च २०२६ रोजी मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पांडुरंग बाबुराव जगताप रा. झरी बु. यांच्या घरी त्यांचा मेव्हणा महादेव रामकिशन ढमाले रा. इंदिरानगर, लातूर आला असताना त्याने पत्नीला सोबत पाठविण्याच्या कारणावरून घरात मोठ्याने आरडाअ ओरड करत शिवीगाळ सुरू केली.

यावेळी पांडुरंग बाबूराव जगताप व त्यांच्या नातेवाईकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता संतापाच्या भरात जवळील चाकू काढून पांडुरंग जगताप याचा चुलतभाऊ बालाजी भाऊराव जगताप याच्या उजव्या बरगडीवर त्याने वार केला. तसेच त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावरही वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच महादेव ढमाले याने पांडुरंग जगताप यांनाही चाकूने जखमी केले तसेच त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली.

chakur crime news
बलात्काराची तक्रार देण्यास गेलेल्या पीडितेच्या पतीला पोलिसाची मारहाण ?

जखमी बालाजी जगताप यांच्यावर सध्या लातूर येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पांडुरंग जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महादेव ढमाले यांच्या विरुद्ध चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर पोलिस निरीक्षक बालाजी भंडे यांनी भेट दिली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गिरीश चामले हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news