Latur Crime| आयपीएल क्रिकेट सट्टा : एकास अटक; 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल
Crime
CrimePudhari
Published on
Updated on

लातूर ः स्थानिक गुन्हे शाखेने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ मोड येथे आयपीएल क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या एका आरोपीला अटक केली. या कारवाईत 7 लाख 6 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

15 मे रोजी रात्री पोलिसांना येरोळ मोड येथील एका हॉटेलजवळ मारुती स्वीफ्ट कारमध्ये बसून आयपीएल सामन्यावर ऑनलाईन सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एम एच-55-बी-0534 क्रमांकाच्या कारची तपासणी केली.

Crime
एलसीबीचा 'क्लीन बोल्ड'! जामनेरमध्ये आयपीएल सट्टेबाजीचा डाव उधळला

यावेळी तातेराव शिवाजी दंडीमे (वय 34, रा. उदगीर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन मोबाईल, एक लॅपटॉप, रोख रक्कम, सट्ट्याच्या हिशोबाच्या डायऱ्या, कॅल्क्युलेटर व कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Crime
Samruddhi expressway robbery case : समृद्धी मार्गावरील दरोड्याचा उलगडा

आरोपी मोबाईल व लॅपटॉपच्या माध्यमातून आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन बेटिंग स्वीकारत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर अनंतपाळ पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news