एलसीबीचा 'क्लीन बोल्ड'! जामनेरमध्ये आयपीएल सट्टेबाजीचा डाव उधळला

Jalgaon news | १० लाखांच्या मुद्देमालासह चौघांच्या मुसक्या आवळल्या; ४१ एटीएम कार्ड जप्त, सट्टेबाजांचे धाबे दणाणले
Online Betting
Published on
Updated on

जळगाव : भारतामध्ये आयपीएलचा ज्वर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आयपीएलचे क्रिकेटचे सामने हे अंतिम टप्प्यात आलेले असताना त्यावर क्रिकेटची बॅटिंग मोठ्या प्रमाणात होत आहे. असाच एक प्रकार जामनेर शहरातील हिवरखेडा रोड परिसरात एका घरात सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच छापा टाकून पोलिसांनी तब्बल १० लाख ५३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत चार सट्टेबाजांना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्याकडून तब्बल ४१ एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आली आहेत.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जामनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिवरखेडा रोडवर काही इसम आयपीएल मॅचवर ऑनलाईन सट्टा लावून जुगार खेळत असल्याची पक्की बातमी एलसीबीला मिळाली होती. मिळालेल्या सूचनेवरून पथकाने सापळा रचून सदर ठिकाणी धडक छापा टाकला. यावेळी घरात ऑनलाईन जुगाराचे मोठे रॅकेट सुरू असल्याचे समोर आले. पोलिसांनी अचानक दिलेल्या धक्क्याने सट्टेबाजांची पळापळ झाली, मात्र पथकाने सर्वांना जागेवरच ताब्यात घेतले.

छाप्यादरम्यान पोलिसांनी सट्टेबाजांच्या ताब्यातून रोख रक्कम ९ लाख ०२ हजार ३०० रुपये, मोबाईल फोन १ लाख ३० हजार रुपये किमतीचे विविध हँडसेट २५, हजार रुपये किमतीचा टीव्ही आणि साउंड बार, ४१ नग विविध बँकांचे एटीएम कार्ड, एकूण जप्त मुद्देमाल १० लाख ५३ हजार 800रुपये जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये देवानंद सुभाष सोनवणे २) रितेश अशोक नेरकर ३) परीक्षेत रवींद्र पाटील आणि ४) प्रवीण जगन्नाथ टहाकडे (सर्व राहणार जामनेर) या चौघांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक २३६/२६ नुसार महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४१ एटीएम कार्ड मिळून आल्याने या सट्टेबाजीचे जाळे नेमके कुठे आणि किती खोलवर पसरले आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या धडक कारवाईमुळे जामनेर परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news