लातूर जिल्ह्यात महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस मोठा भाऊ

उदगीर, अहमदपूर, निलंगा व रेणापूरला भाजपाचा नगराध्यक्ष; औसा राष्ट्रवादीकडे
NCP Alliance
लातूर जिल्ह्यात महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस मोठा भाऊ File Photo
Published on
Updated on

In Latur district, the NCP is the senior partner in the Mahayuti alliance

लातूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात चार नगरपालिका व एका नगरपंचायतीसाठी झालेल्या महायुतीने महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव करीत पाचही स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ता प्रस्थापित केली आहे. उदगीर, निलंगा अहमदपूर व निलंगा या चार नगरपरिषदांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष विराजमान झाला आहे तर रेणापुर नगरपंचायतीतही भाजपनेच बहुमताने झेंडा फडकावत आपला नगराध्यक्ष बसवला आहे. तर औसा नगरपरिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला दूर ठेवत एक हाती सत्ता मिळवून आपला नगराध्यक्ष केला आहे.

NCP Alliance
Ahamadpur Municipal Council Election Result 2025 |अहमदपूरात सत्ता राष्ट्रवादीची पण नगराध्यक्षपदी भाजपाचे ॲड.स्वप्नील व्हत्ते

लातूर जिल्ह्यात पाच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण 128 जागांसाठी व पाच नगराध्यक्ष पदांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला धोबीपछाड देत आपली सत्ता स्थापन केली. उदगीर नगर परिषदेमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने युती करून शिंदे शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धूळ चारली. तेथे भाजपचे नगराध्यक्ष स्वाती हुडे विजयी झाल्या, तर काँग्रेसच्या कादरी अंजुम फातिमा सय्यद पराभूत झाल्या. भाजपच्या 13, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20, काँग्रेसच्या पाच व एमआयएमच्या दोन जागा निवडून आल्या. शिंदे शिवसेनेला तर भोपळाही फोडता आला नाही.

औसा नगर परिषदेच्या निवडणुकीत माझी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी भाजपला आव्हान देऊन स्वबळावर 17 जागा निवडून आणल्या. त्यांच्या भगिनी परविन शेख यांनी भाजपच्या उमेदवार ज्योती बनसोडे यांचा पराभव केला.

NCP Alliance
Latur Municipal Election Result 2025 | लातूर जिल्ह्यात महायुतीचा झेंडा; मविआला मोठा धक्का

तेथे भाजपला मागच्या इतक्याच सहा जागांवर कायम राहावे लागले. निलंगा नगरपरिषदेत देशमुख विरुद्ध निलंगेकर लढाईत भाजपने तब्बल 15 जागा जिंकत बहुमत मिळविले व आपला नगराध्यक्ष निवडून आणला. संजयराज हलगरकर यांनी काँग्रेसचे उमेदवार शेख हमीद इब्राहिम यांचा पराभव केला. काँग्रेसला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले.

अहमदपूर निवडणुकीत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाने कडवे आव्हान देऊन नगराध्यक्ष निवडून आणला असला तरी त्यांना केवळ तीन जागा पदरात पडल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 16 जागा निवडून आल्या. तेथे भाजपचे स्वप्निल व्हते नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले, त्यांनी अभय मिरकले यांचा पराभव केला. शिवसेना पक्षाला एक तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तीन आणि ठाकरे यांच्या शिवसेनेला दोन जागा मिळाल्या.

रेणापुरमध्ये भाजपचे आमदार रमेश आप्पा कराड व काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख यांच्यातच निवडणूक असल्याचे चित्र उभे ठाकल्याने निवडणूक चुरशीची ठरली होती. मात्र यामध्ये आमदार कराड यांनी भाजपचे दहा नगरसेवक निवडून आणत शोभा अकनगिरे यांना नगराध्यक्षपदी विजयी केले. तर काँग्रेसला अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक व अपक्षाला एक जागा मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news