

He cheated the government by creating a fake document on the letterpad of Gram Panchat
उदगीर, पुढारी वृत्तसेवा उदगीर तालुक्यातील वंजारवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नावाने बनावट शिक्के, बनावट लेटरपॅड, बनावट सही आणि बनावट लाभार्थांचे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र तयार करुन शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी हाय्यक कामगार आयुक्त कार्यालय नांदेड येथील सरकारी कामगार अधिकारी यास्मिन अब्दुलगणी शेख यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अनोळखी एजंट, अनोळखी मल्टीसर्वोव्हसेस सेंटरचे चालक आणि अनोळखी बांधकाम ठेकेदार यांच्या विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जा-नेवारी २०२५ ते ८ जुलै पर्यंत उदगीर तालुक्यातील वंजारवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नावाने एजंट, मल्टीसर्वीव्हसेस सेंटरचा चालक आणि बांधकाम ठेकेदार यांनी संगनमत करुन कट रचून शासकीय योजनेचा अर्थीक लाभ घेण्याचे उददेशाने वंजारवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नावाने बनावट दस्ताऐवज, बनावट शिक्के व बनावट लेटरपॅड बनावट सही करून बनावट लाभार्थांचे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र तयार केले.
तसेच वंजारवाडी ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकारी अस्तित्वात नसतांना ते अस्तिवात असल्याचे खोटे दाखवुन शासनाची फसवणुक करुन शासकीय योजनेचा अर्थीक लाभ घेण्याच्या उददेशाने बनावट दस्ताऐवज तयार करून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय लातुर येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात एकुण ४७ अर्ज दाखल केले आहेत. अधिक तपास पो. उप.नि. गणेश कदम हे करीत आहेत.