

Gutkha worth Rs 8.75 lakh was seized from three grocery stores.
निलंगा, पुढारी वृत्तसेवा: शहरातील शिवाजीनगर भागातील तीन किराणा दुकानांमध्ये पोलिसांनी धाड टाकून जवळपास पावणेनऊ लाखांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ किराणा दुकानात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा सापडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळा-लेली माहिती अशी की, शिवाजीनगर भागातील मनोद्दीन रज्जाक तांबोळी, सुनील संजय खोत व रतन गोविंद गरड यांच्या किराणा दुकानामध्ये विमल, रजनीगंधा अशा विविध प्रकारचे सुगंधी गुटखा असल्याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली.
त्या आधारे तपासणी केली असता तिन्ही दुकानांत ८ लाख ८६ हजार २२० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. किराणा दुकानांमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्याची कारवाई निलंगा पोलिसांनी केली आहे.
याबाबत पोलिस उपनिरीक्षक श्रीमती ए. आर. माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनुद्दीन रजाक तांबोळी, सुनील संजय खोत, रतन गोविंद गरड यांच्या विरुद्ध निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किराणा दुकानात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असेल तर मुख्य गुटख्याची तस्करी करणारे सू-त्रदारांचे गोडाऊन तपासण्याची गरज आहे. शिवाय औराद शहाजानी या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी महाराष्ट्रात होते जवळच कर्नाटक सीमा असल्यामुळे गुटखा महाराष्ट्रात येत असतो यासाठी वरिष्ठ पोलिस यापेक्षा मोठी धाड टाकून कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.