Latur News : भूजल पातळीत ४.२० मीटरची घट; रेणापूर तालुक्यात जलसंकट गहिरे

प्रकल्पात केवळ १५ टक्के जलसाठा; पुनर्भरणासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापराची गरज
Latur News
Latur News : भूजल पातळीत ४.२० मीटरची घट; रेणापूर तालुक्यात जलसंकट गहिरेfile photo
Published on: 
Updated on: 

Groundwater level drops by 4.20 meters; water crisis intensifies in Renapur taluka

रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस आणि वाढत्या उन्हामुळे जलसंकटाची तीव्रता वाढली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा भूजल पातळीत सरासरी ४.२० मीटरची घट झाल्याचे भूजल पातळी निरीक्षण अहवालातून समोर आले आहे. विहिरी आणि बोअरवेलनी तळ गाठला असून, रेणा मध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. व्हटी प्रकल्पासह अन्य जलसाठेही कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Latur News
Latur News : दुष्काळग्रस्तांच्या व्यथा ऐकण्यासाठी राज्यपाल बांधावर

कायमच रेणापूर तालुका पाणीटंचाईच्या छायेत राहिला आहे. यंदा तालुक्यात अवघा ३६८.७ मिमी पाऊस झाला. पावसाचे पाणी शेतशिवाराबाहेर वाहून गेले नाही. त्यामुळे रेणा नदीसह ओढे-नालेही प्रवाहित झाले नाहीत. रेणा नदीवरील रेणापूर बॅरेजमध्ये काही प्रमाणात पाणी असले तरी ते दूषित झाले आहे.

परिणामी, नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या तालुक्यातील २३ गावांमध्ये ३८ ठिकाणचे पाण्याचे स्रोत अधिग्रहित करून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. केंद्रीय भूजल मंडळाच्या २०२५ मधील मूल्यांकनानुसार भूजलाचा वार्षिक उपसा पुनर्भरणापेक्षा अधिक होत आहे.

Latur News
Latur News: महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक; दोन हरणांचा बळी

त्यात शेतीसिंचनासाठी होणाऱ्या पाण्याच्या वापराचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे केवळ भूजल पुनर्भरण करून चालणार नाही, तर पाण्याचा काटेकोर गरजेचे वापर आणि संवर्धनही आवश्यक आहे. यासाठी 'जलतारा' योजना आणि 'पाणी अडवा, पाणी जिरवा' मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी होणे आहे. दरम्यान, केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाने सुरू केलेल्या 'पुनर्भरण मोबाईल अॅप्लिकेशन आणि वेब पोर्टल' या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास भूजल पुनर्भरणासाठी योग्य ठिकाणे निश्चित करता येतील.

पर्जन्यमान, जमिनीची जलधारण क्षमता, उतार आणि पाण्याचा निचरा यांची माहिती उपलब्ध होऊन नियोजन करणे शक्य होणार आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी आतापासूनच प्रयत्न झाले नाहीत, तर आगामी काळात जलसंकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

भूजल पातळीतील बदल चिंताजनक

रेणापूर तालुक्यात २०२४ मध्ये भूजल पातळीत २.६१ मीटरने वाढ झाली होती. २०२५ मध्ये ही वाढ केवळ ०.३३ मीटर राहिली. यंदा मात्र भूजल पातळीत सरासरी ४.२० मीटरची घट नोंदविण्यात आली आहे. पर्जन्यमानातील कमतरता आणि वाढता उपसा यामुळे भूजलसाठ्यावर परिणाम झाला असून, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता चिंताजनक बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.