

Green Latur activities Great response from people
लातूर, पुढारी वृतसेवा : जिल्ह्यातील वृक्षाच्छादन वाढावे व प्रत्येकाला शुध्द श्वास अन निसर्गाचा सहवास लाभावा, खाद्यसंस्कृती जपावी, या प्रांजळ जानीवेने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी गतवर्षीपासून सुरू केलेल्या माझ लातूर हरित लातूर या उपक्रमास याही वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद देत रविवारी आयोजित लातूर हरितोत्सवात लातुरकरांनी हज-ारो रोपट्यांची खरेदी केली. लातुरकरांच्या वृक्षप्रेमाचा हा वर्षाव सर्वांना सुखावून तर गेलाच त्याचवेळी जिल्हाधिका-यांनी सुरू केलेल्या या पर्यावरण हितैषी उपक्रमास लातुरकरांनी लोकचळवळ म्हणून स्विकारल्याची साक्षही या सोहळ्याने दिली.
'गंजगोलाई येथे आयोजित 'लातूर हरितोत्सव'चे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते झाले. या निमित्ताने महात्मा गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली. त्यात विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यंदा हरित महोत्सवासोबतच रानभाजी महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होऊन तिला चळ वळीचे स्वरूप द्यावे. 'हरित लातूर 'साठी सर्वजण एकजुटीने प्रयत्न करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, लातूर मनपा आयुक्त मानसी, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ आणि संगीता टकले, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नन्हे-विरोळे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, तहसीलदार सौदागर तांदळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके, साहाय्यक वनसंरक्षक राहुल शेळके, लातुरचे वनरगृरीक्षेत्र अधिकारी धनंजय पोटे, वनपरिमंडळ अधिकारी लातूर निलेश बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त असून, त्या आता दुर्मीळ होत चालल्या आहेत. नवीन पिढीला त्यांची माहिती मिळावी आणि त्यांचे महत्त्व समजावे, यासाठी रानभाजी महोत्सव उपयुक्त ठरेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
लातूरकरांनी रोपटे तसेच अन्य साहित्य मनसोक्त खरेदी केले, विविध खाद्यपदाथांचा आस्वाद घेतला. रानभाज्यांचे महत्व जाणून घेतले. एकाच छताखाली सबलत्तीच्या दरात रोपटे, रानभाज्या, खत, कुंड्या, अवजारे मिळाली. मोफत माहिती अन मार्गदर्शन लाभले याबद्दल समाधान व्यक्त करीत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या अभिनव उपक्रमाचे लातुरकरांनी मनभरून कौतूक केले. लातूरचे पर्यावरण, खाद्य संस्कृती जपणारा हा उपक्रम वर्षा मॅडमनी आता केवळ एक दिवसाचा नव्हे चार दिवसाचा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
या महोत्सवाताअंतर्गत नर्सरीचे ३७ स्टॉल होते. याशिवाय खाद्यपदार्थाचे स्टॉल्सही उभारण्यात आले होते. प्रत्येक स्टॉल्सवर खरेदीसाठी सर्व वयोगटातील लातुरकरांनी गर्दी केली होती. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद वाचता येत होता.
अगदी रोजच्या मजुरीवर हाता तोंडाची गाठ पडणाऱ्या अनेक माय माऊल्यांनीही या हरितोस्वात रोपटे खरेदी केली. झाडाची माया अन त्याचा उपकार कसा सांगावा बाबा, असे म्हणत एका माऊलीने ३०० रुपयाचे रोपटे खरेदी केल्याचे एका विक्रेत्याने सांगितले.