Latur Rain News : तहसीलच्या तळमजल्यात पाच फूट पाणी

तहसील कार्यालयाच्या तळमजल्यात चार ते पाच फूट पाणी साचल्यामुळे तळ मजल्याला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे.
Latur Rain News
Latur Rain News : तहसीलच्या तळमजल्यात पाच फूट पाणीFile Photo
Published on
Updated on

Five feet of water in the ground floor of the tehsil

रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : तहसील कार्यालयाच्या तळमजल्यात चार ते पाच फूट पाणी साचल्यामुळे तळ मजल्याला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे. यातील साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी तहसील प्रशासन सतत प्रयत्नशील आहेत परंतु पाणी काही केल्या हाटत नाही. सध्या साडेसात एचपीची मोटार लावून नगर पंचायतचे कर्मचारी पाण्याचा उपसा करीत आहेत.

Latur Rain News
Latur News : रेणापूर जिल्हा परिषद शाळेचा गाडा चालतो केवळ आठ शिक्षकांवर

तहसील कार्यालयाशेजारी न्यायालय, विश्रामगृह, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर कार्यालये आहेत. मागील पावसाने या परिसरात पाणी साचल्याने त्याचा पाझर फुटून तहसील कार्यालयाच्या तळमजल्यात पाणी साचले आहे. हे पाणी बाहेर काढण्यासाठी इंजीनचा वापर केला गेला परंतु पाणी कांही केल्या हाटत नाही.

Latur Rain News
Latur News : आ. अभिमन्यू पवार यांच्याकडून अतिवृष्टी बाधितांना ९० लाखांची मदत

जेवढे पाणी बाहेर पडते तेवढेच परत साचत आहे. समसापूर व पिंपळफाट्यापासून पावसाचे पाणी रेणा नदीकडे वाहत येते. हे पाणी सरळ नाल्याव्दारे वाहून जात होते. परंतु तहसील समोरची नाली बुजल्यामुळे हे पाणी वाहून जात नाही. तहसील कार्यालयाच्या चोहोबाजूंनी चढ असल्यामुळे अडलेले पाणी झिरपून सरळ तळमजल्यात साचत आहे. साडे सातच्या मोटारीने नगरपंचायतचे कर्मचारी साचलेले पाणी बाहेर काढीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news