

Devni Gurdhal village farmer death
देवणी : तालुक्यातील गुरधाळ येथील एका शेतकऱ्याने सततची नापिकी व वाढत्या कर्जाला कंटाळून घराच्या स्लॅबच्या कडीला दोर बांधून गळफास घेऊन आपले जीवन संपविले. ही घटना बुधवारी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरधाळ (ता. देवणी) येथील शेतकरी श्रीधर पंढरी घोगरे यांनी कर्जाला व सतत होणाऱ्या नापिकीला कंटाळून राहत्या घरी जीवन संपविले. या प्रकरणी फिर्याद मृताचे भाऊ दामोदर पंढरी घोगरे यांनी दिली आहे. यावरुन देवणी पोलिसांत आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवणी पोलिसांनी पंचनामा केला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक नारायण डप्पडवाड करत आहेत.
पेरणीनंतर तब्बल ४० दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने यावर्षीही नापिकी होणार. आता बँकेचे कर्ज कसे फेडायचे व घरप्रपंच कसा भागवायचा या विवेचंनात ते गेल्या काही दिवसांपासून होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.