

Cultivation of Ganja in Gairan Land in Latur District
लातूर, पुढारी वृत्तसेवा
गावालगतच्या गायरान जमिनीत एकाने चक्क गांजाची लागवड केल्याचे उघड झाले आहे. गांजाच्या लागवडीची माहिती खबऱ्याकडून मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा व रेणापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने निवाडा (ता. रेणापूर) येथे १५ जुलै रोजी दुपारी कारवाई करून १ लाख ९४ हजार ४०० रुपये किमतीचा ९.७किलो गांजा झाडांसह जप्त करण्यात आला. तसेच गांजाची लागवड करणाऱ्या एकास बेड्या ठोकण्यात आल्या.
रेणापूर तालुक्यातील निवाडा गावात गायरान खुल्या जागेवर गांजाची लागवड होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याअधारे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, रेणापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय निकम यांच्या नेतृत्वातील पथकाने निवाडा गावातील गांजाचे झाडे लावलेल्या गायरान जमिनीवर टाकून गांजाची ९.०७ किलो वजनाची झाडे जप्त केली आहेत.
या प्रकरणी पोलिस ठाणे रेणापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात सदर गायरान जमिनीच्या जवळ रा हणारा व सदरची जमीन ताब्यात बाळगणारा इसम विजयकुमार राघू गायकवाड (वय ४५, रा. निवाडा) याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलिस ठाणे रेणापूरचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय निकम यांच्या नेतृत्वात पथकातील सहायक पोलिस निरीक्षक सदानंद भुजबळ, आदिनाथ पाटील नंदलाल चौधरी पोलिस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, गणेश साठे, सतीश सारोळे, विश्वनाथ गिरी, शिवकुमार कच्छवे, दत्तात्रय गिरी, चंद्रकांत केंद्रे, अरुणकुमार बनसोडे यांनी केली.