

Excise department action, goods seized
लातूर : पुढारी वृत्तसेवा
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उदगीर विभागाने ११ ते २६ डिसेंबर या कालावधीत अवैध मद्यविक्री, अवैध धंदे व वाहतुकीविरोधात कारवाई धडक कारवाई केली. या कारवाईत देशी व विदेशी मद्यासह वाहने असा एकूण साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर १७ जणांना अटक केली.
राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे विभागीय उपायुक्त बी. एच. तडवी यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्हयाचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ११ ते २६ डिसेंबर या कालावधीत लातूर जिल्हयात अवैध महा निर्मिती, विक्री, वाहतूक विरोधात उदगीर विभाग यांनी एकूण १७ गुन्हे नोंद करण्यात आले. यात १७ आर ोपींना अटक करण्यात आली. सदर गुन्हयामध्ये ४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच हातभट्टट्टी दारु ६२ लि., रसायन १२८० लि. देशी ८४ लि., विदेशी १२ लि., असा एकूण ४ लाख ४९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर नोंदविलेल्या गुन्हयांमध्ये अवैध धाब्यांवर दारु पिण्यास मनाई असतांना धाबा मालक यांनी दारु पिण्यास जागा दिल्याबाबत तसेच मद्यपर्पीविरुध्द कलम ६८, ८४ नुसार सक्त कारवाई करण्यात आली.
सदरच्या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत, उप अधीक्षक एम. जी. मुपडे, निरीक्षक वि. ओ. मनाळे, दुय्यम निरीक्षक आर. डी. भोसले, एन. टी. रोटे, एस. पी. काळे सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, जवान शितल पवार, ज्योतीराम पवार, संतोष केंद्रे, विशाल गायकवाड यांनी सहभाग नोंदविला.