

लातूर : जून मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेत लातूर विभागाचा निकाल ६२.३१ टक्के लागला असून राज्यात हा विभाग दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. विभागात ७७.६६ अशी टक्केवारी घेत धाराशिव जिल्हा प्रथम, ६०.९७ टक्के मिळवत लातूर द्वितीय तर ६०.४० टक्के घेत नांदेड जिल्हा तृतीय आला आहे.
विभागात ५ हजार ३१२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती ५ हजार १०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ३ हजार १८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागात मुलींच्या उत्तीर्णतची टक्केवारी ६५.५८ असून मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ६०.८४ टक्के असे आहे. जिल्हानिहाय निकाल पहाता विभागात प्रथम स्थानी असलेल्या धाराशिव जिल्ह्यातून ४९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
शाखानिहाय निकालात विभागाची विज्ञान ७३.७१, कला ५३.३२, वाणिज्य ४३.४७, व्होकेश्रल ४२.१० असा आहे. जिल्ह्याचा शाखा निहाय निकाल लातूर- विज्ञान ७७.४९, कला -४४.६२, वाणिज्य ४०, व्होकेशनल २२.६० नांदेड - विज्ञान ६९.५५, कला - ५२.८५, वाणिज्य ३५.७८, व्होकेशनल ६१.२९ धाराशिव विज्ञान ७२.६६, कला ७९.६२,
४८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ३७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लातूर जिल्ह्यातून २ हजार ४४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती २ हजार ३२९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले व त्यातील १ हजार ४२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागात तृतीय स्थानी असलेल्या नांदेड जिल्ह्यातून २ हजार ३७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २ हजार २८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १ हजार ३८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ६०.६८ तर मुलींची ५९.७७ अशी आहे. धाराशिव मध्ये मुली ८२.७८ तर मुलांची उत्तीर्णता टक्केवारी ७५.९५ अशी आहे. लातूर जिल्ह्यात हे चित्र मुली ६८. ३८ तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ५७.५३ अशी असल्याचे लातूर परीक्षा मंडळाचे सचिव सुधाकर तेलंग यांनी सांगितले.
जून मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या पुरवणीपरीक्षेत लातूर विभागाचा निकाल ५०.३८ टक्के लागला असून राज्यात हा विभाग दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. विभागात ५९.२६ अशी टक्केवारी घेत नांदेड जिल्हा प्रथम, ५५.९३ टक्के मिळवत धाराशिव द्वितीय तर २६.४७ टक्के घेत लातूर जिल्हा तृतीय आला आहे.
विभागात २ हजार ६९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती २ हजार ५९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १ हजार ३०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ५१.२४ असून मुलींच्या उत्तीर्णतचे प्रमाण ४८.०७ टक्के असे आहे. जिल्हानिहाय निकाल पहाता विभागात प्रथम स्थानी असलेल्या नांदेड जिल्ह्यातून १ हजार ५७७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. १ हजार ५२२
विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ९०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या धाराशिव जिल्ह्यातून ४२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती ४१३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले व त्यातील २३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागात तृतीय स्थानी असलेल्या लातूर जिल्ह्यातून ६९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ६६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
नांदेड जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ५९.८९ तर मुलींची ५७.५६ अशी आहे धाराशिव मध्ये मुले ६०.७२ तर मुलींची उत्तीर्णता टक्केवारी ४२.७२ अशी आहे. लातूर जिल्ह्यात हे चित्र मुले २५.२० तर मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी २९.९३ अशी असल्याचे लातूर परीक्षा मंडळाचे सचिव सुधाकर तेलंग यांनी सांगितले.