

Chakur Innovation Center for students to find new ideas
संग्राम वाघमारे
चाकूर : जिल्हा परिषद शाळेतील मुलं आणि मुलींना नवकल्पना शोधण्याचे इनोव्हेशन सेंटर नव्याने निर्माण करण्यात आले असून यामध्ये अत्याधुनिक सुसज्य तंत्रज्ञान प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. काम पूर्ण झाले असून लवकरच ही प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटर मंजूर करण्यात आले.
ही प्रयोगशाळा वातानुकूलीत तर यामध्ये इंटिग्रेटेड क्लासरूम आहेत. या प्रयोगशाळेसाठी जवळपास १ कोटी रुपयाचे नवीन कल्पनांना प्रत्यक्ष, संशोधनाधारित, तांत्रिक आणि औद्योगिक रूप देणारे आधुनिक केंद्र तयार करण्यात आले आहे. या प्रयोगशाळेचा उपयोग १ ली ते १० वर्गाच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. यातून विद्यार्थ्यांना प्रयोग, शोध, नवकल्पना आणि प्रात्यक्षिक शिक्षणासाठी आधुनिक शैक्षणिक प्रयोगशाळा आहे.
येथे विद्यार्थी स्वतः करून नवोपक्रम शिकतात. याचा उपयोग विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित विद्यार्थ्यांमध्ये क्षमता विकसित करण्यासाठी होतो. इनोव्हेशन सेंटरमध्ये संशोधन व प्रयोग तंत्रज्ञान साधने, सॉफ्टवेअर, प्रोजेक्ट डेस्क, प्रोटोटायपिंग, ३ प्रिंटर, लेझर कटिंग, रोबोटिक्स, तांत्रिक सल्ला मेंटर्स, तज्ञ वैज्ञानिक, अभियंते स्टार्टअप व व्यवसाय बिझनेस मॉडेल, आयडिया डेव्हलपमेंट, फंडिंग मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यशाळा, कॉन्फरन्स, हॅकथॉन आणि तांत्रिक कोर्सेस सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
इनोव्हेशन सेंटरचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांतील शोधक वृत्ती वाढवणे, समाजातील समस्यांना तंत्रज्ञान / कल्पक उपाय शोधणे, स्टार्टअप व उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देणे, नवीन संशोधन, मशीन, उत्पादने आणि तंत्रज्ञान निर्माण करणे आहे. शाळांतील इनोव्-हेशन सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट उद्योगजगतात जोडते, रोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून तंत्रज्ञानावर आधारित आत्मनिर्भरता निर्माण करते.
भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हे तालुक्यातील पहिले सेंटर आहे. याचा लाभ जिल्हा परिषद शाळेतील गरीब, होतकरू मुली आणि मुलांना मिळणार असून यातून विद्यार्थ्यांमध्ये आत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, विज्ञान साहित्याचा परिचय व अभ्यासुवृत्ती निर्माण होवून त्यांचे उज्वल भविष्य घडणार आहे. भविष्यातील करिअर आणि स्टार्टअप संस्कृतीला चालनाही मिळणार आहे.
या प्रयोगशाळेची उभारणी जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात करण्यात आली असून चहू बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या लॅबच्या सुरक्षिततेसाठी लॅबला तारेचे कुंपण आहे. लॅबची सुरक्षितता आणि ती अधिक काळ टिकविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्याची गरज आहे. मुख्याध्यापक राजकुमार गड्डीमे यांच्या पुढाकारातून या लॅबच्या सुरक्षिततेसाठी सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्याकडून ३० हजार रुपये वर्गणी करून लॅबच्या साईडची पडलेली शाळेची संरक्षण भिंत बांधकाम करण्यात येत आहे. वरिष्टाने लक्ष देण्याची गरज आहे