Latur District Bank : लातूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख, उपाध्यक्ष अविनाश जाधव

धीरज देशमुख यांची सलग दुसऱ्यांदा निवड; सभासद हित केंद्रस्थानी
Latur District Bank
Latur District Bank : लातूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख, उपाध्यक्ष अविनाश जाधवfile photo
Published on: 
Updated on: 

Dheeraj Deshmukh appointed as Chairman, Avinash Jadhav as Vice-Chairman of Latur District Bank

लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी अविनाश बाळासाहेब जाधव यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. बुधवारी (दि. २५) झालेल्या विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही घोषणा केली. या निवडीमुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात देशमुख यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

Latur District Bank
Latur Sugarcane Rate Protest : ऊस काटामारीविरोधात संघर्ष समिती आक्रमक

नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने बहुमत मिळवले होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी अन्य कोणाचाही अर्ज दाखल न झाल्याने दोन्ही निवडीबिनविरोध झाल्या.

निवड जाहीर होताच बँक परिसरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून जल्लोष केला. डिसेंबर २०२१ मध्ये धिरज देशमुख यांची प्रथमच बँकेच्या अध्यक्षपदी निवडझाली होती.

Latur District Bank
Latur News : वाळत असलेला अपरिपक्व ऊस शासनाने खरेदी करावा

त्यांच्या मागील कार्यकाळात शेतकऱ्यांना पीकविमा परताव्याचेवितरण, ज्येष्ठ नागरिक व लाभार्थ्यांचे निवृत्तिवेतन थेट खात्यात जमा करणे, ग्रामीण भागात २४ तास एटीएम सुविधा आणि मोबाईल एटीएम व्हॅन सुरू करण्यासारखे उपक्रम राबविण्यात आले. दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर धिरज देशमुख यांनी संचालक मंडळ, मतदार आणि जिल्ह्यातील जनतेचे आभार मानले. शेतकरी, कष्टकरी आणि तरुण उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून बँकेच्या माध्यमातून नवनवीन योजना राबविण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या निवडीचे स्वागत करत लातूरच्या सहकार क्षेत्रातील यश राज्यातील सहकार चळवळीला बळ देणारे असल्याचे म्हटले. तर माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन करून शेतकरी आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य देत बँकेची गौरवशाली परंपरा पुढे नेण्याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.