MLC Election | धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद निवडणूक : मिलिंद महालिंगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

आंबेडकरी चळवळीत सक्रिय कार्यकर्ते म्हणून चाकूर तालुक्यात महालिंगे यांची ओळख
Dharashiv Latur Beed Vidhan Parishad Election
विधान परिषद निवडणुकीसाठी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक मिलिंद महालिंगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाPudhari
Published on
Updated on

Dharashiv Latur Beed Vidhan Parishad Election

चाकूर : धाराशिव, लातूर आणि बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक मिलिंद महालिंगे यांनी शुक्रवारी (दि.२९) उमेदवारी अर्ज दाखल केला.

आंबेडकरी चळवळीत सक्रिय कार्यकर्ते म्हणून चाकूर तालुक्यात महालिंगे यांची ओळख असून, दलित चळवळीच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. चाकूरचे पहिले ऐतिहासिक नगराध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी शहराच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवून महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Dharashiv Latur Beed Vidhan Parishad Election
Thane MLC election: शिंदे सेनेचा बविआला राजकीय प्रस्ताव? फाटक-ठाकूर भेटीने राजकीय खळबळ

त्यांच्या कार्याची दखल घेत कार्यकर्त्यांनी त्यांना विधानपरिषदेवर पाठविण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २९ मे) धाराशिव येथे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कडवकर यांच्याकडे त्यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज सादर केला.

यावेळी प्रा. दिनकर काकनाटे, प्रभाकर गायकवाड, राजू पटणे यांच्यासह समर्थक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dharashiv Latur Beed Vidhan Parishad Election
MLC Election | विधान परिषद : महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्रित निर्णय घेणार

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना मिलिंद महालिंगे यांनी सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकास, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना न्याय देणे तसेच धाराशिव, लातूर आणि बीड या तिन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, या उमेदवारीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news