आ. अभिमन्यू पवारांनी विकासाचा अनुशेष भरून काढला: उपमुख्यमंत्री फडणवीस

आ. अभिमन्यू पवारांनी विकासाचा अनुशेष भरून काढला: उपमुख्यमंत्री फडणवीस
latur news
आ. अभिमन्यू पवारांनी विकासाचा अनुशेष भरून काढला: उपमुख्यमंत्री फडणवीसpudhari photo
Published on
Updated on

लातूर, पुढारी वृत्तसेवा : आमदार अभिमन्यू पवार यांनी औशाच्या विकासाचा अनुशेष भरून काढला असून अशक्य वाटणारी कामेही त्यांनी पुर्ण करुन दाखवली आहेत, एका सामान्य कुटुंबातील मुलगा आमदार झाल्यास काय परिवर्तन होऊ शकते हे मतदारसंघातील जनतेने अनुभवले असून येणाऱ्या काळातही आपला आशिर्वाद अभिमन्यू पवार यांच्या पाठीशी राहू द्या आम्ही तितक्याच ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

औसा व कासार सिरसी बसस्थानकांसह २२ कोटींच्या विकासकामांचा लोकार्पण आणि ८७ कोटींच्या विकासकामांचा भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले औसा मतदारसंघात विकासाचे परिवर्तन तुम्ही अनुभवत आहात. अभिमन्यू पवार यांनी केलेली विकासाचे कामे विधीमंडळातील उत्तम कामगिरी आहे. त्यांनी औसा पाणीपुरवठ्याची मागणी माझ्याकडे केली होती.

ती मंजुरही केली आता ती योजना सुरू झाली आहे. औसा शहरातील मुख्य रस्त्याचे केवळ भूमिपूजन व्हायचे पण आ अभिमन्यू पवार यांच्या कारकीर्दीत आम्ही निधी देऊन ही कामे पूर्ण केली. औसा शहराला सुमारे ५०० कोटींचा निधी दिला. किल्लारी सहकारी साखर कारखाना, शेतरस्ते, पांणद रस्ते कासारसिरसी व किल्लारी अपर तहसील कार्यालय, किल्लारी भूकंपग्रस्तांचे रखडलेली कामे आमदार अभिमन्यू पवार यांनी मार्गी लावली औसा उपजिल्हा रुग्णालयासाठी १०० कोटी मंजूर केले असून ते काम लवकरच सुरू होईल. बेलकुंड येथे एमआयडीसीत उद्योग सुध्दा आणणार आहोत.

वेणाऱ्या काळातही आपण पूर्ण ताकदीने आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठीशी उभे राहावे आम्ही तितक्याच ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहोत अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

३ हजार कोटींची कामे पूर्णत्वास : आ. अभिमन्यू पवार

आ. अभिमन्यू पवार यांनी मतदारसंघातील औसा, कासारसिरसी व लामजना येथे बसस्थानक उभारले असून औसा शहरातील बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरण व सुधारणा कामही पूर्ण झाले आहे. औशात पाचशे कोटींची विकास कामे तर मतदारसंघात ३ हजार कोटींचा विकास कामांचा टप्पा पूर्ण होत आहे. वाढीव शहर पाणीपुरवठय़ाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. औसा हे स्वच्छ, सुंदर व सुरक्षित शहर करण्याचे आपले स्वप्न असून त्यासाठी जनतेची साथ आवश्यक आहे. चांगले उद्योग येणाऱ्या काळात आणले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

विकासाचा अनुशेष भरणार तरी कधी?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news