

Cylinders Unavailable Despite Holding Cards; Citizens Distressed
ज्ञानेश्वर भंडारे
वलांडी : देवणी तालुक्यासह परिसरातील अनेक नागरिकांना घरगुती गॅस मिळण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना गॅस कार्ड असूनही सिलिंडर मिळत, नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. अतिरिक्त पैसे घेऊन घरगुती गॅस हॉटेलधारकांना बरोबर गॅस पुरवठा होत आहे. प्रशासनाने याकामी लक्ष पुरवावे अशी मागणी होत आहे.
नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे, पासबुक तसेच ऑनलाइन नोंदणी पूर्ण करूनही गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी सांगितले की, वारंवार गॅस एजन्सीच्या फेऱ्या मारूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या, तरीही गॅस मिळत नाही, मग योजना कशासाठी?"
असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागात विशेषतः महिलांना याचा मोठा फटका बसत असून, अजूनही लाकूडफाटा वापरून स्वयंपाक करावा लागत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शासनाने दिलेल्या आश्वासनांनुसार सर्वांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण होताना दिसत नाही. स्थानिक प्रशासन व संबंधित गॅस एजन्सींनी या समस्येकडे गांभीर्यान लक्ष देऊन तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर गॅस कनेक्शन देण्यात यावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.