

चाकूर, पुढारी वृत्तसेवा :
तळणी येथे अज्ञात व्यक्तीने एका शेतकऱ्याच्या शेतातील हरभऱ्याचा ढिग जाळल्याची घटना २० ते २१ मार्च दरम्यान सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडल्याची उघडकीस आली असून यामध्ये शेतकऱ्याचे १ लाख ८० हजाराचे नुकसान झाले आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी, व्यंकट विठ्ठल पोतले रा. तळणी यांच्या गट नं. १९१ मधील शेतात २० ते २१ मार्च दरम्यान सकाळी सात वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सुमारे ९० कट्टे हरभरा जाळून अंदाजे १ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान केले आहे. या प्रकरणी व्यंकट विठ्ठल पोतले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बी. बी. मामडगे करीत आहेत.