Latur Crime News : चाकूर पोलिसांनी आवळल्या अवैध गुटखा विक्रेत्यांच्या मुसक्या, ७० हजारांचा गुटखा केला जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

घटनास्थळावरून पोलिसांनी दोन लाख रुपये किमतीच्या कारसह हा मुद्देमाल जप्त केला आहे.
Latur Crime News
चाकूर पोलिसांनी आवळल्या अवैध गुटखा विक्रेत्यांच्या मुसक्या, ७० हजारांचा गुटखा केला जप्त, दोघांवर गुन्हा दाखलFile Photo
Published on
Updated on

Chakur police have arrested illegal gutkha sellers

चाकूर : पुढारी वृत्तसेवा

शासन प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची बेकायदेशीररीत्या विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या दोघांच्या शनिवारी सकाळी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून सत्तर हजारांचा गुटखा जप्त करून त्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Latur Crime News
Operation Sindoor | पाकिस्‍तानला ठाम आणि निर्णायक प्रत्युत्तर देऊ : डीजीएमओ राजीव घई

पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सहायक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांच्या पथकातील पोलिस हवालदार सिराज शेख, दीपक सोनकांबळे, व्यंकट हंगरगे यांनी चाकूर येथील उजळंब रस्त्यावर एका एम एच ०३ बी सी ५४४२ कारची तपासणी केली. त्‍यावेळी कारमध्ये शासन प्रतिबंधित असलेला ७० हजार दोनशे रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखू आढळून आला.

घटनास्थळावरून पोलिसांनी दोन लाख रुपये किमतीच्या कारसह हा मुद्देमाल जप्त केला आहे. पो.कॉ दीपक सोनकांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैलास रमाकांत गोलावार (वय २५) व दिगांबर माणिक धोंडगे (वय ५३) दोघेही रा. चाकूर यांना अटक करण्यात आली आहे.

Latur Crime News
India Pakistan Conflict : 'भूकेकंगाल' पाकिस्तानचे डोळे उघडणार तर कधी? वाचा 'संभाव्‍य' आर्थिक नुकसानीची आकडेवारी

त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पंकज निळकंठे हे करीत आहेत.

Latur Crime News
china double diplomacy : चीनचा डबल गेम... पहलगाम हल्‍ल्‍याचा पहिला केला निषेध, नंतर पाकिस्‍तानला म्‍हटले 'पोलादी मित्र'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news