

Body of youth washed away in Lendi River found
पालम, पुढारी वृत्तसेवा : प्रशासनासह तालुक्यातील खोरस गावातील एक २५ वर्षीय युवक हा लेंडी नदीच्या पाण्यात वाहून गेला होता. एनडीआरएफच्या जवानांनी सलग तीन दिवस अथक परिश्रम घेत त्याचा शोध घेतला. दरम्यान रविवारी त्याचा मृतदेह पेठपिंपळगाव शिवारात सापडला.
परमेश्वर साहेबराव खंडागळे (वय २५) असे वाहून मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. परमेश्वर हा दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शेतातून घराकडे परत येत असताना लेंडी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पाय घसरल्याने वाहून गेल्याची खळबळजनक घटना घडली होती.
घटनेची माहिती मिळताच नागरिकांसह पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली होती. मात्र अंधार असल्याने शोध कार्याला मागील दोन दिवसापासून सायंकाळी ६ वाजेनंतर अडथळा निर्माण झाला होता.