Rishikesh Karad : प्रशिक्षित कार्यकर्ता भाजपाच्या विचारधारेचा कणा

भाजपा प्रशिक्षण शिबीर उद्घाटनप्रसंगी ऋषिकेश कराड यांचे प्रतिपादन
JP achievements workers contribution
प्रशिक्षित कार्यकर्ता भाजपाच्या विचारधारेचा कणाpudhari photo
Published on
Updated on

लातूर :भारतीय जनता पार्टी जगात एक नंबरचा राजकीय पक्ष आहे. कार्यकर्त्यांना शंभर टक्के न्याय देणारा एकमेव भाजपा पक्ष आहे. प्रशिक्षित कार्यकर्ता हा भाजपाचा कणा असून कार्यकर्त्याच्या मेहनतीमुळे, कष्टामुळे पक्षाने यशाची अनेक सर्वोच्च पदे प्राप्त केली आहेत असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश रमेशआप्पा कराड यांनी केले.

पं. दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत औसा तालुक्यातील भादा मंडल प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ भाजपाचे युवा नेते ऋषिकेश रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते शनिवारी करण्यात आला. या प्रसंगी जिपच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. शिवकन्याताई गोडभरले, रेणापूर पंस उपसभापती शरद दरेकर, जि.प. सदस्य महादेव साळुंके, प्रशिक्षण वर्ग जिल्हा सहसंयोजक रोहिदास वाघमारे, जिप सदस्या छायाताई पद्माकर चिंचोलकर, जिप सदस्य संदिपान शेळके, पंस सदस्या भाग्यश्री साळुंके, पंस सदस्य परमेश्वर लांडगे, भाजपा मंडल अध्यक्ष उद्धव काळे, प्रताप पाटील, सुरज शिंदे, रुपेश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

JP achievements workers contribution
Raosaheb Danve : कार्यकर्त्यांनी जनसेवेचे माध्यम म्हणून काम करावे

या प्रशिक्षण वर्गात 90 भाजपाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुखांनी सहभाग घेतला. जनतेची सेवा करण्यासाठी भारतीय जनता पक्ष निवडणुकीना सामोरे जातो निवडणुकीतून मिळालेल्या पदाच्या माध्यमातून सर्वच लोकप्रतिनिधींनी जास्तीत जास्त जनतेची कामे केली पाहिजे त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत असे सांगितले.

यावेळी बोलताना ऋषिकेश कराड म्हणाले की, प्रत्येक बूथ स्तरापर्यंत भाजपा पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करावी पक्षाचे संघटन यशाकडे घेऊन सत्ता आली की काही जणांची नाराजी वाढते मात्र सत्तेच्या काळातही विविध कामाच्या माध्यमातून जनतेचे सेवक समजून जनतेला आनंदी ठेवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे केंद्र आणि राज्य शासनाने गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या अनेक योजना सुरू केले आहे या योजनेचा लाभ गरजूंना आणि पात्र लाभार्थ्यांना मिळून देण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कार्यरत राहावे असेही ऋषिकेश दादा कराड यांनी बोलून दाखविले.

JP achievements workers contribution
Satara Zilla Parishad elections: झेडपी निवडणुकीत भाजपशी घरोबा नको

प्रारंभी मंडल अध्यक्ष उद्धव काळे यांनी प्रास्ताविक भाषणातून मंडळातील भाजपाच्या कामाचा आढावा दिला.या प्रशिक्षण शिबिरात वैचारिक अधिष्ठान, भाजपाचा इतिहास, कार्यपद्धती, भाजपा सरकारची कामगिरी आणि अंमलबजावणी, सोशल मीडिया यासह विविध विषयावर रोहिदास वाघमारे, सुरज शिंदे, पद्माकर चिंचोलकर, चंद्रकांत कातळे, दिलीप पाटील, नवनाथ मुरकुटे यांनी सत्रातील विषयानुसार आपले विचार मांडले. प्रत्येक सत्रात सत्रप्रमुख म्हणून मान्यवरांची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news