Jalna Water Scarcity | पाणीटंचाई : जिल्हा परिषद ॲक्शन मोडवर

डॉ. कनवारिया यांचे निर्देश, जुई, पद्मावती प्रकल्पांसह जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी
Jalna Water Scarcity
जालनाः जुई, पद्मावती प्रकल्पांसह जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारिया यांच्यासह अधिकारी, कर्मचारी. pudhari photo
Published on: 
Updated on: 

जालना : आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करा. पिण्याच्या पाण्याचा साठा जपून ठेवा आणि पिण्यासाठी राखीव असलेल्या पाण्यातून इतर वापरासाठी केला जाणारा पाणीपुरवठा तात्काळ बंद करा, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारिया यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

भोकरदन शहराला खडकपूर्णा येथून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने डॉ. कनवारिया यांनी जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी पाणीपुरवठा व्यवस्थेची माहिती घेत उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जुई मध्यम प्रकल्प आणि पद्मावती प्रकल्पालाही भेट देऊन तेथील जलसाठ्याची पाहणी केली.

Jalna Water Scarcity
Jalna Accident : गारटेकीत अज्ञात वाहनाच्या धडकेत शिक्षकाचा जागीच मृत्यू

जलसाठ्याचे नियोजन करताना भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून उपलब्ध पाणी जपून वापरणे आवश्यक असल्याचे डॉ. कनवारिया यांनी नमूद केले. पाण्याचा अपव्यय टाळणे, पिण्याच्या पाण्याच्या साठ्याचे संरक्षण करणे आणि पाणीपुरवठा व्यवस्थेवर सातत्याने लक्ष ठेवणे, या बाबींना प्राधान्य देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

जालना जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिली आहे. जिल्हाभरातील लघु मध्यम प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. येत्या काळात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होणार आहे. या टंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. पाण्याच्या स्रोतांची पाहणी केल्या जात आहे.

Jalna Water Scarcity
Jalna Farmers Loan Waiver : बोजा असलेल्या शेतकऱ्यांची पीककर्जासाठी बँकांकडून अडवणूक

या पाहणी दौऱ्यावेळी कार्यकारी अभियंता गजानन जंजाळ, उपअभियंता नरेंद्र ठाकूर, शाखा अभियंता हर्ष सुलताने, शाखा अभियंता अभिजीत बोर्डे, ग्रामविकास अधिकारी समाधान सोनवणे, रमेश दोड, विस्तार अधिकारी अंकुश काकडे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य

आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याने नागरिकांना पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध राहणे आवश्यक आहे. त्यासाठी पाण्याचा वापर नियंत्रित करणे आणि उपलब्ध जलसाठ्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे. पिण्यासाठी राखीव असलेल्या पाण्याचा इतर कामांसाठी वापर होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे डॉ. कनवारिया यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news