Pokhara Scheme Subsidy : पोखराचा लाभ वर्षभरापासून रखडला; मंजुरी-नामंजुरीच्या फेऱ्यात शेतकरी!

औसा : स्प्रिंकलर, फळबाग लागवडीचे अनुदान अडकले; कृषी विभागाच्या कारभारावर संताप
Pokhara Scheme Subsidy
Pokhara Scheme Subsidypudhari photo
Published on: 
Updated on: 

जयपाल ठाकूर

औसा: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या, तरी प्रशासकीय दिरंगाईमुळे पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत. औसा तालुक्यात पोखरा योजनेंतर्गत स्प्रिंकलर संच, नारळ व आंबा लागवडीसाठी वर्षभरापूर्वी ऑनलाइन अर्ज करूनही अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या कारभाराविषयी लाभार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, अर्ज कोणत्या स्तरावर प्रलंबित आहेत, मंजुरी मिळाली की नामंजुरी, याची स्पष्ट माहिती मिळत नसल्याची तक्रार आहे. काही अर्जांची स्थिती आठ-दहा वेळा मंजूर, नामंजूर आणि पुन्हा मंजूर अशी बदलत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अधिकारी-कर्मचारी एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याने शेतकरी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत.

Pokhara Scheme Subsidy
Dharashiv Crime : उमरग्यात १४ वाहनांची तोडफोड होऊनही गुन्हा दाखल नाही

विशेषतः फळबाग लागवडीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी जूनमध्ये नारळ व आंब्याची लागवड केली. मात्र, अनुदान मिळाले नसल्याने लागवडीचा खर्च आणि देखभालीचा भार त्यांच्यावर पडला आहे. योजनेच्या अपेक्षेने केलेल्या खर्चामुळे काही शेतकऱ्यांचे १० ते १५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार आहे.स्प्रिंकलर संचासाठी वर्षभरापूर्वी अर्ज केला; अद्याप लाभ मिळाला नाही.

गावात पोखरा योजनेचा लाभ नेमका कुणाला मिळाला, हेही समजत नाही. योजना असून उपयोग काय?, असा सवाल काकासाहेब भोसले यांनी केला.प्रलंबित अर्जांचा तातडीने आढावा घेऊन पात्र शेतकऱ्यांना अनुदान द्यावे आणि अर्ज रखडण्याची कारणे स्पष्ट करावीत, अशी मागणी होत आहे.

Pokhara Scheme Subsidy
Chhatrapati Sambhajinagar Accident : लाडगावजवळ पहाटे अपघात; ५० प्रवासी बालंबाल बचावले !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.