

भूम : लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयात सहावीत शिकणारी अनुष्का पाटोळे हिचा छळ करून तिची थंड डोक्याने हत्या करण्यात आली असून, ही हत्या आत्महत्येचा बनाव करून झाकण्यात आली आहे, असा गंभीर आरोप करत भूम तालुका सकल मातंग समाजाच्या वतीने संपूर्ण भूम शहर बंद ठेवून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या प्रकरणात अत्यंत चतुराईने पुरावे नष्ट करून आत्महत्येचा बनाव करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत असून, या प्रकरणाची एसआयटी चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा, तसेच लातूर जिल्हाधिकाऱ्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांमुळेच या चिमुकलीला खरा न्याय मिळेल, असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केला.
सरकारने तत्काळ कारवाई न केल्याने 12 जानेवारी रोजी भूम तालुक्यातील सकल मातंग समाज रस्त्यावर उतरला. गोलाई चौकात रास्ता रोको आंदोलन, निषेध मोर्चा आणि चक्काजाम करण्यात आला. हा मोर्चा अण्णा भाऊ साठेनगर गांधी चौक नागोबा चौक ओंकार चौक गोलाई चौक या मार्गाने काढण्यात आला व नंतर उपविभागीय अधिकारी कार्यालय, भूम येथे धडक देण्यात आली.चारही बाजूंचे रस्ते बंद करून चक्काजाम करण्यात आला. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा गृहमंत्रालय यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय, भूम यांच्यामार्फत देण्यात आले. नगरसेविका लक्ष्मी साठे , मा.नगरसेविका विजया साठे मा.नगरसेविका जया साठे, लता साठे, सुहासिनी साठे, संगीता साठे, सुमन साठे दत्ता साठे, अण्णा साठे, बबन साठे, नारायण साठे, प्रदीप साठे, किरण साठे, सचिन साठे, गणेश साठे, शैलेश साठे, अमोल साठे, नितीन साठे, अमोल साठे, रविंद्र साठे, प्रविण साठे, विनोद साठे, सुजित साठे, मनोज क्षीरसागर, गणेश साठे, हनुमंत साठे, संतोष साठे, कुणाल आडागळे, आकाश साठे, राम साठे, दिनेश दुबळे, जितेंद्र साठे, प्रमोद आडागळे, लखन साठे , विनोद थोरात, योगिराज साठे, कांता, साठे, सुभाष साठे, तसेच महिला लहान बालके यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.