

लातूर, पुढारी वृत्तसेवा : गांधी चौक मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या खून प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. राजपाल ऊर्फ राजू विठ्ठलराव गायकवाड, (वय ३३. रा. विक्रम नगर, लातूर), अजय सोमनाथ घोडके, (वय २७ रा. जुनी लेबर कॉलनी लातूर), प्रवीण बाबुराव कांबळे, (वय ४० रा. एलआयसी कॉलनी लातूर) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास लातूर मध्यवर्ती बसस्थानका जवळ मोटारसायकलला धडक दिल्याच्या कारणावरून अज्ञात व्यक्तींनी काही तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या तरुणावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दरम्यान ही घटना गांर्भीय पाहता पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहायक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलिस ठाण्याची पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्यात येत होता.
स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिस ठाणे पथकाने शीघ्रगतीने कार्यवाही करत गुन्ह्यातील आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेत अटक केली सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी साहेबराव नरवाडे, दिलीप सागर, अरविंद पवार, संतोष पाटील यांनी रात्रीतून आपापल्या पोलिस ठाणे हद्दीत शांतता अबाधित ठेवली.
पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक आर. आर. कन्हे हे पुढील तपास करीत आहेत. पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलिस अंमलदार विनोद चिलमे, खुर्रम काझी, दिनानाथ देवकते, रियाज सौदागर, युवराज गिरी, जमीर शेख, राजेश कंचे, संतोष देवडे, चालक अमलदार बंडू नीटुरे सचिन कांबळे, अर्जुन राजपूत, विनोद कातळे यांचा समावेश होता.