

Accused who had been absconding for 19 years arrested
लातूर, पुढारी वृत्तसेवा लातूर पोलिसांच्या विशेष पथकाने १९ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर गजाआड केले. अभंग प्रभु ऊर्फ प्रभाकर सूर्यवंशी (५३ वर्षे) असे त्याचे नाव असून त्याच्याविरुध्द याच्यावर २००६ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
त्याने स्वतःला ग्रामपंचायत टाकळीचा सरपंच असल्याचे सांगून २९ मुलांचे बोगस जन्मदाखले तयार केले होते. आरोपीने शाळांमध्ये मुलांच्या प्रवेशासाठी ४० ते ५० रुपये घेऊन बोगस दाखले दिले होते. यामुळे २००६ पासून आरोपी पोलिसांपासून लपून राहात होता आणि ठिकाण बदलत होता. तपासातील अधिक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपीला त्याच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले.
आरोपीला पोलीस स्टेशन गांधी चौक येथे आणून न्यायालयात हजर केले, न्यायालयाने जिथे त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. सदर कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विशेष पथकातील पोलिस सपोनि शिवशंकर मनाळे, पोउपनि संजय भोसले, दत्तात्रय शिंदे आणि श्रीकांत कुंभार यांनी या ही कारवाई केली.