लातूर : वस्तीगृहातील अल्पवयीन मुलीवर संचालिकेच्या मुलांकडून अत्याचार; मुलीचा मृत्यू

संचालिकेसह तिच्या मुलांवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; शवविच्छेदन अहवालाने बिंग फोडले
Abuse of girls
वस्तीगृहातील अल्पवयीन मुलीचा मृत्यू File Photo
Published on
Updated on

लातूर,पुढारी वृतसेवा : लातूर शहरात कस्तुरबा कन्या छात्रालयात मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहातील एका अल्पवयीन मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याबाबत काही दिवसांपूर्वी आक्समात मृत्यूची नोंद पोलिसांत करण्यात आली होती. तथापि मयत मुलीच्या वडीलांनी संशय घेत दुसऱ्यांदा इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यास सांगितले. या शवविच्छेदन अहवालातून संबधित मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचे उघड झाले. त्यावरुन वस्तीगृह संचालिकेसह तिच्या दोन मुलांवर विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आशा सदाशिव गुट्टे, शंकर सदाशिव गुट्टे आणि विठ्ठल सदाशिव गुट्टे अशी संशयीतांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे.

Abuse of girls
Thane Crime News | गतिमंद भिक्षेकरी मुलीवर अल्पवयीन मुलांचा सामूहिक बलात्कार

कस्तुरबा कन्या छात्रालय नावाचे वस्तीगृह आहे. तिथे एका मजुराच्या दोन मुली 2023 पासून राहत होत्या. 28 जून रोजी सकाळी वसतीगृह संचालिकेने मुलीच्या वडीलांना त्यांची मुलगी दोरीत पाय अडकून पडल्याने तिला सरकारी दवाखान्यात अॅडमिट केले आहे, असे सांगितले. वडील दवाखान्यात पोहचल्यानंतर डॉक्टरांनी मुलगीचे निधन झाल्याचे सांगितले.

Abuse of girls
Jalgaon Crime | धमकी देत शेतात महिलेवर अत्याचार, संशयिताला अटक

लातूर येथील शासकीय रुग्णालयात मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले होते. परंतु, मुलीच्या वडीलांनी मुलीचे इन कॅमेरा शवविच्छेदन करावे, अशी मागणी केली. लातुरमध्ये तशी सोय नसल्याने सोलापूर येथील रुग्णालयात मृतदेह नेण्यात आला. तिथे मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळले. मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली. या वरुन पोलिसांनी वसतीगृह संचालिका व तिचे दोन मुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. दरम्यान मयत मुलीच्या बहिणींने तिच्या बहिणीवर रात्री घडलेला प्रसंग वडिलांना सांगितला असून फिर्यादीत त्यांनी तो नमुद केला आहे. अधिक तपास लातूर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news