Latur News : अर्ध्या गुंठ्यात अवघे ७७० ग्रॅम सोयाबीन; उत्पादनाची दाहकता उघड

पाणी देऊन जगवलेल्या पिकाचीही दैना; सरसकट मदतीची मागणी
Latur News
Latur News : अर्ध्या गुंठ्यात अवघे ७७० ग्रॅम सोयाबीन; उत्पादनाची दाहकता उघडfile photo
Published on: 
Updated on: 

A mere 770 grams of soybean from half a guntha; the harsh reality of the yield revealed

रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : पोहरेगाव जिल्हा परिषद गटातील कोळगाव येथील शेतकरी चंद्रकांत वडजकर यांच्या शेतात करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगात अर्ध्या गुंठ्यात अवघे ७७० ग्रॅम सोयाबीनचे उत्पादन निघाले. विशेष म्हणजे हे पीक स्प्रिंकलरद्वारे पाणी देऊन जगविण्यात आले होते. तरीही उत्पादन अत्यल्प निघाल्याने यंदाच्या दुष्काळाची तीव्रता स्पष्ट झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

Latur News
Latur News : सरसकट मदत म्हणता, मग पंचनाम्याचा घाट कशासाठी?

रेणापूर तालुक्यात सध्या सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू असून, त्याचबरोबर विविध ठिकाणी पीक कापणी प्रयोगही घेतले जात आहेत. सोमवारी कोळगाव येथे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चंद्रकांत वडजकर यांच्या शेतातील पाणी दिलेल्या सोयाबीनच्या पट्टयात हा प्रयोग केला. अर्ध्या गुंठ्यातील पीक कापणी व मळणीनंतर सोयाबीनचे वजन केले असता केवळ ७७० ग्रॅम उत्पादन मिळाले. या प्रयोगाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गंगासिंह कदम यांनी सरसकट आर्थिक मदतीची मागणी केली.

'मुख्यमंत्री शेतकऱ्यांना सरसकट मदत देणार' असे सांगत असताना पंचनामे आणि पीक कापणी प्रयोग कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. तालुक्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पीक वाळून गेले आहे. त्यामुळे पंचनाम्यांच्या प्रक्रियेत वेळ न घालवता शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. उत्पादन खर्च वाढत असताना उत्पन्न मात्र घटत आहे.

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला, तर यंदा पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रेणापूर तालुका दुष्काळी जाहीर करण्यात आला असून, पीक नुकसानभरपाई, पीक विमा आणि आवश्यक आर्थिक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, असे कदम यांनी सांगितले.

Latur News
Latur News : लातूर शहरातील ११ जलकुंभांची पाहणी

पीक कापणी प्रयोगावेळी पंचायत समिती सदस्य बालाजी गोटके, कृषी सहायक राजश्री कांबळे, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी नितीन जाधव तसेच शेतकरी उपस्थित होते. शेतकरी वाचला तरच शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था वाचेल. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सदैव आवाज उठवत राहू, असे कदम यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news